आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच आजेसासूबाईंच्या भूमिकेत सुकन्या मोने, ही आहे ‘घाडगे & सून’ची कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नं, ज्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. नवीन नात्यांसोबत येणाऱ्या अपेक्षा, बंधनं, कुटुंबची परंपरा जपत सासरच्या सदस्यांच्या मनात तिला स्वत:चं एक अढळ स्थान निर्माण करायाच असतं. अशीच एक सामान्य घरातून आलेली मुलगी परंपरा आणि रुढींमध्ये अडकलेल्या सासरला कसं आपलसं करून घेईल? हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे कलर्स मराठीच्या नव्या मालिकेमध्ये. टेल अ टेल मिडिया निर्मित (जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे) परंपरेच्या कोंदणात नात्यांची रंगत या कथासूत्रावर आधारित “घाडगे & सून” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे १४ ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
 
प्रभावशाली संवादफेक आणि त्याला उत्कृष्ट अभिनय जोड असलेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने मालिकेमध्ये माई घाडगे ही व्यक्तीरेखा साकारणार असून त्यांच्यासोबत अतिशा नाईक, चिन्मय उदगीरकर आणि निवोदित भाग्यश्री लिमये, उदय सबनीस, प्रफुल्ल सामंत प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

पुढे वाचा, काय आहे या मालिकेची कथा...  
 
बातम्या आणखी आहेत...