आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'नकळत सारे घडले\' मालिकेविषयी जाणून घ्या सर्वकाही... स्वप्नील जोशीची आहे निर्मिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या काळात बदलत्या नातेसंबंधांची कहाणी सांगणारी नवी मालिका 'नकळत सारे घडले' २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशीनं या मालिकेद्वारे निर्मितीमध्ये पदार्पण केलं आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार सायं. ७:३० वाजता पहायला मिळणार आहे.

 

'नकळत सारे घडले' या मालिकेत गोष्ट आहे मुलीची... जी एका छोट्या मुलीची प्रेमळ, काळजी घेणारी सावत्र आई होते. त्या बरोबरच या मालिकेला काही वेगळे पदरही आहेत. कोल्हापूरात राहणाऱ्या आणि वेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबाची ही गोष्ट आहे. ही आजच्या मॉडर्न काळातली रंजक गोष्ट आहे.

 

उत्तम कथानक असलेल्या या मालिकेत उत्तम स्टारकास्टही आहे. हरीश दुधाडे, नुपूर परूळेकर, बाल कलाकार सानवी रत्नालीकर, अनुराधा राजाध्यक्ष, उमेश दामले, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची, प्राची पिसाट, यांच्या भूमिका आहेत. अभिजित गुरू यांनी मालिकेची कथा, पटकथा लिहिली आहे. अभिजित पेंढारकर संवादलेखन करत आहेत. तर, अवधूत पुरोहित दिग्दर्शन करत आहेत. मालिकेचं टायटल साँग नीलेश उजल या नव्या दमाच्या गीतकाराचं असून, टायटल साँगचं संगीत नीलेश मोहरीर यांचं आहे.

 

मालिके विषयी निर्माता स्वप्नील जोशी म्हणाला, 'या मालिकेत नात्यांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहाण्याचा हा एक अप्रतिम प्रयत्न आहे. या मालिकेत नाट्य आहे, भावभावना आहेत, खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. म्हणूनच या मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. स्टार प्रवाहच्या देवयानी, पुढचं पाऊल अशा काही मालिका म्हणजे मराठी टेलिव्हिजनवरचे बेंचमार्क आहेत. निर्माता म्हणून मला खात्री आहे, की 'नकळत सारे घडले' ही आमची मालिका स्टार प्रवाहच्या आजवरच्या लौकिकाला साजेशी ठरेल.'

 

बातम्या आणखी आहेत...