आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, काय आहे 'नकटीच्या लग्नाला यायचं हं..' या नव्या मालिकेची Story

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठी वाहिनीवर येत्या 18 जानेवारीपासून ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित होणारेय.  अभिनेत्री प्राजक्ता माळी या मालिकेत मध्यवर्ती पात्र साकारत आहे. यापूर्वी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ताने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता तिच्या या नव्या मालिकेत काय वेगळं प्रेक्षकांना बघायला मिळणार त्याविषयी आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.  
 
काय आहे या नव्या मालिकेची कथा... 
ही कथा आहे देशपांडे कुटुंबियांची. दामोदर निवास या एका जुन्या वाड्यात एकत्र राहणारं हे कुटुंब. दामोदर देशपांडे यांच्या पश्चात या कुटुंबात चंद्रकांत आणि सुर्यकांत ही दोन मुले, मुलगी शैला आणि तिचा नवरा जयंता ही मंडळी एकत्र राहतात. यातील सुर्यकांत आणि विजूची मुलगी आहे नूपुर जिला सर्वजण लाडाने ‘नकटू’ अशी हाक मारतात. याच नकटूची आणि तिच्या लग्नाची ही गोष्ट. या नूपुरचं लग्न या वाड्यातच व्हावं ही दामोदररावांची शेवटची इच्छा होती. या लग्नानंतरच हा जीर्ण झालेला वाडा पाडावा आणि त्याजागी इमारत उभी करावी अशी त्यांची एक प्रकारची अटच. त्यामुळे आता सर्वांना घाई आहे ती नूपुरच्या लग्नाची. यासाठी त्यांच्या नजरेत एक मुलगासुद्धा आहे तोही याच घरातला तो म्हणजे नूपुरची आत्या शैलाचा मुलगा नीरज. परदेशात असलेला नीरज घरातील एका समारंभानिमित्ताने भारतात येतोय आणि याचवेळी लग्नाची बोलणी करण्याचा निर्णय कुटुंबातील सदस्य घेतात. नीरज परत येतो आणि त्याला ही लग्नाची लगबग लक्षात येते आणि तो या लग्नासाठी नकार देतो. खरं तर आजवर नीरजचीच स्वप्ने बघणारी नूपुर त्याच्या या निर्णयाने दुःखी होते त्यामुळे तिच्यासाठी मुलगा शोधण्याची जबाबदारी नीरज स्वतःवर घेतो आणि घरात सुरु होतो कांद्यापोह्याच्या तयारीचा आगळा वेगळा समारोह. नूपुरसाठीचं वरसंशोधन हाच या मालिकेचा मुख्य गाभा!! आता नकटीसाठी कोणकोणती स्थळे येतात तोच या मालिकेचा महत्त्वाचा आणि गंमतीचा भाग असणार आहे.

पुढे वाचा, नकटीला बघायला येणा-या सेलिब्रिटींविषयी...