आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजाचा ठोका चुकवणारी ‘झी युवा’ची नवीन मालिका 'रुद्रम', दीर्घ काळानंतर मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नात्यांच्या सुरक्षित चौकटीत, हसत खेळत आनंदी जीवन जगणाऱ्या व स्वतःच कुटुंब हेच विश्व मानणाऱ्या सर्वसाधारण स्त्रीच्या आयुष्यात, जेव्हा एखादं अनपेक्षित वादळ येते; तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होते. आणि मग हीच सर्वसाधारण स्त्री, तिच्या भोवतालची सुरक्षित चौकट मोडून अन्यायाचा मागोवा घेते. एक अनपेक्षित अनुभव देणाऱ्या ‘ती' च्या प्रतिशोधाचा थरार म्हणजेच झी युवावर नवीन आलेली मालिका रुद्रम.  या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एक अप्रतिम थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 
 
प्रत्येक भागाबरोबर एक वेगळीच उत्कंठा वाढवत रुद्रम या मालिकेचा प्रवास सुरु होतो. सगळ्यात वेगाने घडणारी आणि तरीही केवळ ठराविक भागांमध्ये संपणारी ही गोष्ट अतिशय लक्षणीय आणि उल्लेखनीय आहे. व्यावसायिकदृष्ट्या इतकं बांधीव आणि अजिबात बेतलेलं वाटू नये असं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयात उजवी असलेली मालिका, रसिक प्रेक्षकांच्या वाट्याला क्वचितच येते. या मालिकेचा विषय गुतागुंतीचा असूनही तो अतिशय सोप्या रूपात मांडला आहे आणि या मालिकेची सर्वात जमेची बाजू म्हणजे "मुक्ता बर्वे". छोट्या पडद्यावर कमी वेळा दिसलेल्या पण दीर्घ छाप पाडून गेलेल्या या नायिकेने या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रभावीपणे रंगवली आहे . मुक्ताची ही व्यक्तिरेखा तमाम रसिकांना नक्कीच आवडेल. गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वेचे मोठ्या काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन होणार आहे. 'रुद्रम' या मालिकेत तिच्यासोबत वंदना गुप्ते, सतीश राजवाडे, मोहन आगाशे, संदीप पाठक, किरण करमरकर, मिताली जगताप, सुहास पळशीकर, विवेक लागू, सुहास सिरसाट, सई रानडे, अनिरुद्ध जोशी, मिलिंद फाटक, सुनील अभ्यंकर, आनंद अलकुंटे, किरण खोजे, आशिष कुलकर्णी या आणि अशा उत्तमत्तोम नामांकित कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यामुळेच रसिकांसाठी ही मालिका एक मेजवानी ठरणार आहे.
 
झी युवा वाहिनीद्वारे मराठी टेलिव्हिजनवर एक नवे पर्व सुरू झाले आणि ज्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना टीव्ही बघण्याचा एक नावीन्यपूर्ण अनुभव मिळाला.झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले कि ,"आज टेलिव्हिजन बघणा-या लोकसंख्येमध्ये युवा प्रेक्षकवर्ग अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो आहे. सध्या अगदी नवीन विषयांचा दर्जेदार आशय प्रेक्षकांना देणारी वाहिनी म्हणून  झी युवा ची एक वेगळी ओळख प्रेक्षकांमध्ये बनली आहे. प्रेक्षकांची आवड निवड लक्षात घेऊनच झी युवा एक उत्तम प्रकारची मालिका घेऊन आली आहे. अतिशय नावाजलेले अभिनेते आणि  प्रत्येक व्यक्तिरेखेला ठसठशीत चेहरा देत, झी युवा 'रुद्रम' द्वारे एका वेगाने घडणाऱ्या थरारक गोष्टीची एक संपूर्ण मिनी सिरीज  प्रेक्षकांसमोर जिवंत करत आहे. मोठे कलाकार आणि तितक्याच ताकदीच्या लेखकाची आणि दिग्दर्शकाची एक नवी मालिका म्हणूनही रुद्रम कडे पाहिले जाऊ शकते. रुद्रमच्या पहिल्या एपिसोड पासून ते शेवटच्या एपिसोड पर्यंत ही मालिका प्रेक्षकांची उत्कंठा खिळवून ठेवेल ,याची आम्हाला खात्री आहे.
 
'रुद्रम' या मालिकेची संकल्पना झी युवा या वाहिनीची असून या मालिकेची निर्मिती निखिल सेठ, विनोद लव्हेकर, संदेश कुलकर्णी यांच्या पोतडी एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेने केली आहे. गिरीश जोशी सारख्या लेखकाच्या लेखणीतून आकाराला आलेल्या आणि भीमराव मुडे सारख्या उत्कृष्ट दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या आणि अभिनय संपन्न कलाकारांच्या अभिनयाने सजलेली 'रुद्रम' मालिका ही नक्कीच वेगळी ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...