आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट 'तुझं माझं ब्रेक अप', ही आहे Story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळू हळू ओसरु लागतो. लग्नाआधी एकमेकांशी कायम प्रेमाने वागण्याच्या, कायम सोबत देण्याच्या, कधीही न भांडण्याच्या आणाभाका हवेत विरुन जातात आणि कोणत्या गोष्टीवरुन भांड्याला भांडं लागतं याचा पत्ताही लागत नाही. थोडक्यात काय प्रेमविवाह झालेल्यांच्या घरोघरी या समस्याच्या चुली पेटलेल्या दिसतातच आणि त्यातून वादाचा धूरही निघताना आपण कायम बघतो.
 
प्रेमावर वाद कुरघोडी करतात आणि तेच नात्याच्या आड येतात. अर्थात हे वाद अतिशय छोट्या छोट्या गोष्टींवरुन असतात पण राईचा पर्वत कधी होतो ते दोघांनाही कळत नाही. अशाच काही हलक्या फुलक्या वादांची आणि प्रेमाच्या नात्याची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी 'तुझं माझं ब्रेक अप' या मालिकेमधून. येत्या 18 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
 
पुढे वाचा, काय आहे या मालिकेची कथा...
बातम्या आणखी आहेत...