आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश-आदिनाथ कोठारेंसह सेलिब्रिटी रंगले विठू नामाच्या गजरात, हे आहे खास निमित्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले आहेत. घरचे सर्व एकत्र येऊन बाप्पांची उत्साहाने आरती करत आहेत. स्टार प्रवाह परिवारातील सेलिब्रेटी सदस्यांनी एकत्र येऊन नुकतीच एक आरती नव्या ढंगात सादर केली. या सेलिब्रेटींनी एकत्र येऊन केलेल्या विठुमाऊलीच्या आरतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निमित्त आहे आगामी 'विठुमाऊली' या नव्या मालिकेचं!
 
स्टार प्रवाह लवकरच 'विठूमाऊली' ही नवी मालिका घेऊन येत आहे. या पार्श्वभूमीवर स्टार प्रवाहने नुकतीच विठुमाऊलीच्या आरतीचा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. प्रवाह परिवाराचे सदस्य समीर परांजपे, रुपल नंद, उपेंद्र लिमये, प्रसिद्धी किशोर, हर्षदा खानविलकर, सुपर्णा श्याम, संकेत पाठक, नेहा पवार, रश्मी अनपट, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सायली देवधर, प्रसाद जवादे, संग्राम साळवी या सदस्यांनी एकत्र येत विठूमाऊलीची आरती केली आहे. कोठारे व्हिजनचे महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे ह्यांचा सुद्धा सहभाग होता.  
 
'येई हो विठ्ठले माझे माऊली ये' ही पारंपरिक आरती नव्या ढंगात सादर करण्यात आली आहे. संगीतकार सुयोग चुरी यांनी ही आरती संगीतबद्ध केली आहे. राजेश बिडवे यांनी नृत्यदिग्दर्शन, विनायक जाधव यांनी छायांकन, आलाप मोहिले यांनी सह दिग्दर्शन आणि शिल्पेश कोठारे यांनी दिग्दर्शन केलं आहे. गौरव बुरसे, करण कागळे, पल्लवी केळकर आणि मीरा भालेराव यांना ही आरती गायली आहे.
 
सध्या ही आरती घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गाजत आहे. सोशल मीडियात ही आरती पोस्ट केल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 11 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अवघ्या महाराष्ट्रात 'विठुमाऊली' या मालिकेविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं या प्रतिसादावरून दिसून येत आहे. 
 
पाहुयात, विठू नामाच्या गजरात दंग झालेल्या सेलिब्रिटींची खास झलक आणि शेवटच्या स्लाईडवर आरतीचा व्हिडिओ... 
बातम्या आणखी आहेत...