आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zee Marathi Launches New Serial Ase He Kanyadaan On 24th Jan 2015

झी मराठीची नवी मालिका 'असे हे कन्यादान', वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कहाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः शरद पोंक्षे आणि मधुरा देशपांडे)
प्रत्येक वडिलांसाठी आपली मुलगी ही ‘राजकन्या’ असते आणि मुलीसाठी आपले वडील हे ‘सुपरहिरो’ असतात. आपले सर्व लाड पुरवण्यासाठी ज्यांच्याकडे हट्ट धरता येतो अशी हक्काची व्यक्ती म्हणजे वडील हे मुलींना माहित असतं. मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच तिच्या लग्नाच्या गप्पा सुरू होतात. जिला आपण लाडाने वाढवलं ती एक दिवस नांदायला जाताना आपलं घर सोडून जाणार हे निश्चित असतं आणि यासाठी वडिलांनी आपल्या मनाची तयारीही केलेली असते. मुलीसाठी योग्य वर नि घर निवडणं आणि तिचं कन्यादान करून तिची पाठवणी करणं याबद्दलचे स्वप्न मुलीच्या वाढण्यासोबतच वडिलांच्या डोळ्यात वाढत असतं.
आपल्या मुलीची पाठवणी करतांना त्याच्या डोळ्यासमोरून आठवणींचे असंख्य पट सरकत जातात आणि त्या आठवणी डोळ्यांतील अश्रूंद्वारे बाहेरही येतात. प्रत्येक मुलीची आणि वडिलांची गोष्ट ही बहुतेकवेळा अशीच असते. वडील-मुलीच्या काहीशा अशाच नात्याची, त्यांच्या स्वप्नाची आणि तिच्या कन्यादानाची गोष्ट बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘असे हे कन्यादान’ या मालिकेतून. येत्या शनिवारी 24 जानेवारीपासून सायंकाळी 7.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
काय आहे या नवीन मालिकेचे कथानक जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये..