आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'माझ्या नवऱ्याची बायको\' : वाचा काय आहे गोड संसारासाठी तिखट बनणा-या बायकोची गोष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कःप्रेमाच्या नात्यात एकमेकांची सुख दु:खे वाटून घेतली की ते नातं अधिक घट्ट होतं असं म्हणतात आणि हे नातं नवरा बायकोच असेल तर नात्यांची ही वीण अधिकच मजबूत होते. पण या नात्यात सुख दुखासोबत ते प्रेमच वाटून घेणारा एखादा वाटेकरी आला तर मग हीच वीण सैल होण्याचीही शक्यता असते. मग ही वीण घट्ट करण्यासाठी कधी कधी गाठ जरा जास्तच आवळून बांधावी लागते आणि कधी कधी संसार गोड होण्यासाठी थोडं तिखटही व्हावंच लागतं..
याच कथासुत्रावर आधारीत झी मराठीची नवी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. नवरा बायकोच्या गोड संसारात जेव्हा नवऱ्यावर हक्क सांगणारी एखादी तिसरी व्यक्ती येते तेव्हा हक्काची बायको तिला नवऱ्यापासून दूर ढकलत तिचा तिरस्कार करते? की संसारातील एक आव्हान म्हणून तिचा स्वीकार करते ? याची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका धबडगावकर यांची मुख्य भूमिका असलेल्या नव्या मालिकेची संपूर्ण स्टोरी...
बातम्या आणखी आहेत...