आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूनेची जागा घेणार मुलगी, ‘होणार सून…’च्या जागी दिसणार आता ‘पसंत आहे मुलगी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘होणार सून मी ह्या घरची’ आता संपल्यावर सोमवारपासून रोज रात्री आठ वाजता ‘पसंत आहे मुलगी’ ही नवी मालिका झी मराठीवर दिसणार आहे. रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख ही फ्रेश जोडी ह्या मालिकेतून लाँच होतेय.
चांगल्या गोष्टींचा शुभारंभ करण्यासाठी चांगला मुहूर्त बघण्याची आवश्यकता असते असं मानणारा एक वर्ग आहे. तर ज्या वेळी चांगल्या गोष्टींचा विचार डोक्यात येतो तेव्हाच कामाला सुरूवात करणे हाच खरा मुहूर्त असं मानणारा दुसरा वर्ग आहे. या दोन वर्गाची ही परस्परभिन्न मते आणि त्यावरून होणारे वाद विवाद आपण नेहमीच अनुभवतो. या वादाची प्रचिती विशेषत: येते ती विवाहाच्या प्रसंगी.
लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात पण खाली त्या गाठी जुळवण्यासाठी अनेकजण आधार घेतात ते जन्मपत्रिकेचा आणि पंचागांचा. मुला मुलीच्या राशींपासून ते त्यांच्या कुंडलीत असणा-या ग्रहांची आणि गुणांची तपासणी करूनच लग्नाची बोलणी पुढे सरकते. परंतु ज्यांचं लग्न होणार आहे त्या दोघांची मने जुळलेली असतील तर मग पत्रिका जुळण्याची गरज खरंच उरते का ? पत्रिकेतील ग्रह एखाद्याच्या नात्याचं भविष्य ठरवू शकतात का ? या प्रश्नांवरच आधारित पसंत आहे मुलगी’ ही मालिका झी मराठीवर सुरू होतेय.
एकमेकांवर प्रेम करणारे उर्मी आणि वासू. गावात राहणा-या वासूच्या घरी प्रत्येक गोष्टीला पत्रिका पाहण्याची पध्दत तर शहरात राहणा-या उर्मीच्या घरी कधी कोणी पत्रिकाच बनवली नाही. अशावेळी लग्न जुळवतानाच जर पत्रिकेपासून खटके उडणार असतील तर लग्न कसं होणारं ह्या कथानकावर पसंत आहे मुलगी ही मालिका आधारित आहे. उर्मीच्या भूमिकेत रेशम प्रशांत, वासूच्या भूमिकेत अभिषेक देशमुख आणि वासूच्या वडिलांच्या पंतांच्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक आहेत.
याशिवाय मालिकेत मेघना वैद्य, पद्मनाभ बिंड, केतकी सराफ, नम्रता कदम, रमा जोशी, विजय मिश्रा, सिद्धीरूपा करमरकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नितीन वैद्य आणि निनाद वैद्य यांच्या दशमी क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेची संकल्पना समीर विद्वंस यांची असून पटकथा शार्दूल सराफ यांची आहे तर दिग्दर्शन राजू सावंत यांनी केलं आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, उर्मी आणि वासूची कशी फुलणार लव्हस्टोरी, काय पाहणार मालिकेत