आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुझ्या विना ओ यारा..', सोनू निगमचे FU मधील हे गाणे ऐकून हरवून जाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - आकाश ठोसर याच्या अभिनयाची झलक पाहण्यासाठी चाहते त्याच्या आगामी एफ यू चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाबाबत सध्या सगळीकडे कमालिची उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे संगीत हे या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू असणार अशीही चर्चा सुरुवातीपासूनच होती. याच गोष्टीवर शिक्कामोर्तब करणारे आणखी एक गाणे रिलीज झाले आहे. 

'तुझ्या विना ओ यारा..' असे बोल असलेले हे गाणे प्रसिद्ध गायक सोनू निगमने गायले आहे. सोनूच्या स्वरांचा साज चढलेले हे गाणे आकाश ठोसर आणि इतर कलाकारांवर चित्रित करण्यात आलेले आहे. यापूर्वी चित्रपटाच्या टायटल साँगसह इतरही काही गाणी रिलीज झाली आहेत. त्यात सलमानने गायलेल्या गच्ची या गाण्याचाही समावेश आहे. पण तसे असले तरी, सोनू निगमने गायलले हे गाणे या अल्बममधील बेस्ट साँगपैकी एक असल्याचे जाणवते. 

पुढील स्लाइड्सवर, या नव्या गाण्याची झलक फोटोतून... अखेरच्या स्लाइडवर पाहा गाण्याचा व्हिडीओ..
 
 
बातम्या आणखी आहेत...