आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उफ तेरा ये जलवा' FU चित्रपटाचे गाणे रिलीज, आकाशसह अनेक सेलेब्सचा भन्नाट डान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित एफ यू (फन अनलिमिटेड) हा चित्रपट पुढच्या महिन्यात दोन जूनला प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षी सैराट चित्रपटामुळे चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या आकाश ठोसरला घेऊन महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट केला आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत अधिकच आकर्षण आणि चर्चा आहे. नागराजच्या चित्रपटातील गावाकडचा परशा ते मांजरेकरांच्या चित्रपटातील रॉकस्टार असा आकाश ठोसरचा बदललेला अवतार पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. 

काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकरांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. सोशल मीडियावर हा ट्रेलर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यापाठोपाठ महेश मांजरेकरांनी या चित्रपटातील आणखी एक गाणेही रिलीज केले आहे. विशेष म्हणजे या गाण्यात एकाचवेळी अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेले आकाश, वैदेही, सत्या, संस्कृती यांच्याबरोबरच मेधा मांजरेकर, ईशा कोप्पिकर आणि कश्मिरा शहादेखिल गाण्यात झळकले आहेत. चित्रपट रिलीज व्हायला अजून वर्षभराचा कालावधी आहे. पण चित्रपटात चौदा गाणी आहेत, त्या माध्यमातून आता पुढचा महिनाभर चित्रपटासाठी वातावरणनिर्मिती केली जाणार आहे. चला तर मग पाहुयात चित्रपटाच्या गाण्यात कसा आहे स्टार्सचा अंदाज. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, गाण्यातील काही फोटो अखेरच्या स्लाइडवर पाहा, गाण्याचा व्हिडीओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...