आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ढोलकीच्या तालावर’ नाचल्या मानसी, मेघा, पाहा, दोघींच्या घायाळ करणा-या अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानसी नाईक आणि मेघा घाडगेच्या दिलखेचक अदा
मानसी नाईक आणि मेघा घाडगे ह्या मराठी सिनेसृष्टीतल्या दोन अशा अप्सरा आहेत, की त्या दोघींना पाहिलं, की त्यांच्या चाहत्यांचा कलीजा खलास होतो. तर मग जर ह्या ‘लावण्यवती’ आणि ‘सौंदर्यवती’ अप्सरांनी आपल्या दिलखेचक अदांनी लोकांना घायळ करायला सुरूवात केली, तर त्यांचे प्रेक्षक किती वेडे होतात, ते नुकतंच मुंबईत एका कार्यक्रमात पाहायला मिळालं.
नेहमी लावणी म्हटली, की पुरूषांच्या शिट्या, टाळ्या आणि फेटे उडणं अशा गोष्टी आपण नेहमीच ऐकल्यात आणि सिनेमांमधनं पाहिल्यात. पण मुंबईतल्या ह्या कार्यक्रमात बायका लावणीवर पुरूषांपेक्षाही किती छान रिस्पॉन्स देऊ शकतात, आणि किती धमाल करू शकतात, ते पाहायला मिळालं. ‘कलर्स मराठी’चा ‘ढोलकीच्या तालावर’ हा शो नव्या रूपात आणि नव्या ढंगात २७ जुलैपासून सुरू होतोय, म्हटल्यावर विकेन्डला खास मेघा घाडगे आणि मानसी नाईकच्या फक्कड लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात लहान मुलं आणि बायकांनी मेघा आणि मानसीसोबत त्यांच्या लावणीवर डान्स करून खूप धमाल केली.
मेघा घाडगेने तिची स्पेशालिटी असलेली ‘जरा दाबा की बटण मोबाईलचं’ आणि ‘शिट्टी वाजली’ ह्या लावण्यांवर परफॉर्म करताच तिला जमलेल्या लोकांनी डोक्यावर घेतलं. आणि तिला वन्स मोअर म्हणून पून्हा एकदा परफॉर्म करायला लावलं. आणि तिच्यासोबत उत्स्फूर्त डान्स केला.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय सांगतेय मेघा घाडगे आपल्या फक्कड लावणीवििषयी