आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही यापूर्वी पाहिले नसतील टिव्हीवरील बानूचे असे Looks, पाहा तिचा Social Album

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - झी मराठीच्या प्रेक्षकाना खिळवून ठेवणारी जय मल्हार मालिका अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून प्रेक्षकांना खंडेराया, म्हाळसा आणि बानू यांचा भेट होणार नाही. जवळपास तीन वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर गारूड केलेल्या या मालिकेतील सर्व पात्रही आता महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांना आपल्या घरातील एक असल्याचे वाटते. महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या खंडेरायाच्या जीवनावर आधारित या मालिकेत बानू चे पात्र साकारले आहे, ईशा केसकर या अभिनेत्रीने. 

मूळची पुण्याची असलेल्या ईशाने मानसशास्त्रामध्ये बीए केले आहे. वयाच्या अठराव्या वर्षी तिने पहिले व्यावसायिक नाटक केले होते. रायगडाला जेव्हा जाग येते हे ते नाटक होते. यात ईशाने सईबाईची भूमिका केली होती. योगायोग म्हणजे या पहिल्या भूमिकेनंतर तिला घराघरांत ओळख मिळवून देणारी भूमिकादेखिल ऐतिहासिकच होती. ती म्हणजे जय मल्हारमधील बानू. त्यापूर्वी महाविद्यालयीन काळात तिने अनेक एकांकिका स्पर्धादेखिल गाजवल्या. मंगलाष्टक वन्स मोअर, वुई आर ऑन, हॅलो नंदन, सीआरडी आणि आवाज कोणाचा अशा चित्रपटांत तिने भूमिका केल्या आहेत. 

ईशाला आजवर सर्वांनी बहुधा बानू किंवा बाणाईच्या म्हणजे ऐतिहासिक भूमिकेतच पाहिले आहे. पण खरी ईशा कशी आहे, हे आपल्याला तिच्या किंवा तिच्या नावाने असलेल्या आणि फॅन्सच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून कळते. ईशाचा हा सोशल अल्बम आम्ही आज divyamarathi.com च्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा टिव्हीवरील बानू म्हणजेच ईशा केसकरचे PHOTOS..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...