आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुराधा पौडवालांच्या उपस्थितीत 'ताटवा' चित्रपटाचे म्युझिक लाँच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जातीभेदाच्या विषयावर भाष्य करणाऱ्या ताटवा या आगामी मराठी चित्रपटाचे म्युझिक लाँच नुकतेच प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते झाले. सुंदर कथेच्या कॅनव्हासवर ‘ताटवा’ सिनेमातील गीतांनी सुरेख रंग भरल्याची भावना अनुराधा पौडवाल यांनी यावेळी व्यक्त केली. 

अभिनेते अरुण नलावडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाचे ट्रेलर व गीतांची झलक दाखवण्यात आली. चित्रपट २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात तीन गाणी असून गीतकार श्रीपाद भोले यांचे शब्द आणि संगीतकार अतुल जोशी व प्रशांत फासगे यांचे संगीत लाभले आहे. 'ताटवा' टायटल साँग योगिता गोडबोले-पाठक हिने गायले आहे. तर अतुल जोशी आणि प्रसाद शुक्ल यांनी दोन गाणी गायली आहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...