आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परी बनून 'मोहन..'च्या जीवनात येणार टीव्हीवरील 'राधा', येतेय नव्या मालिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'राधा ही बावरी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अॅक्ट्रेस श्रुती मराठे लवकरच आपल्याला एका नव्या मालिकेतून भेटायला येत आहे. 'जागो मोहन प्यारे' या मालिकेतून श्रुती रोज चाहत्यांना भेटणार आहे. 14 ऑगस्टपासून ही नवी मालिका झी टीव्हीवर सुरू होत आहे. या मालिकेमध्ये श्रुती मराठे बरोबरच अतुल परचुरे आणि सुप्रिया पाठारे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

श्रुती मराठे हिच्या करिअरची सुरुवात झाली होती, ती राधा ही बावरी मालिकेद्वारे. या मालिकेत सौरभ गोखलेबरोबर तिची जोडी पाहायला मिळाली होती. तर चित्रपटांत तिने सनई चौघडे चित्रपटांद्वारे डेब्यू केला होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केले. मराठी चित्रपटांबरोबरच श्रुतीने काही तमिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपटांतही भूमिका केल्या. हिंदीमध्ये गेल्या वर्षी येऊन गेलेल्या बुधिया सिंग सिनेमातही ती झळकली होती. या आगामी मालिकेत श्रुती परीच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेत परी साकारणारी श्रुती रियल लाईफमध्येही एखाद्या परिसारखीच दिसते. तिच्या सोशल साईट्सवरील फोटोंतून तिच्या या रुपाचे दर्शन पाहायला मिळते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रुती मराठे हिचे सोशल मीडियावर तिने शेयर केलेले काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...