आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा ‘बापजन्म’चा Trailer, दसऱ्याच्या पूर्वसंध्येला 29 सप्टेंबरला रिलीज होणार फिल्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निपुण धर्माधिकारीच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबई नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते. ‘बापजन्म’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची असून या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्सने केली आहे. सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे असून निर्मिती सुमतिलाल शाह यांची आहे. चित्रपट 29 सप्टेंबर 2017 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  
 
‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधीकारीनेच लिहिली आहे. तो म्हणतो, “सचिन खेडेकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य आणि सन्मान मानतो. त्यांचे केवळ सेटवर असणेही आम्हा सर्वांसाठीच अगदी प्रोत्साहनात्मक असे.”
 
निपुणने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’साठीच्या ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या वेब शोने त्याला घराघरात पोहोचवले. त्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल घेतली गेला असा तो मराठी कलाकार आहे. निपुणचा 2015 मध्ये ‘फोर्ब्स इंडियाज 30 अंडर 30’मधील एक विजेता म्हणून सन्मान झाला.
 
सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह या चित्रपटात शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि अकर्श खुराणा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत केयूर गोडसे, नीरज बिनीवाले, अमृत आठवले आणि निपुण धर्माधिकारी.   

पाहुयात, सचिन खेडेकरांची प्रमुख भूमिका असलेल्या 'बापजन्म' या चित्रपटाचा ट्रेलर पुढील स्लाईडवर... 
बातम्या आणखी आहेत...