आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Look : निर्मिती सावंत यांचे नवे नाटक, 'श्री बाई समर्थ'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘श्री बाई समर्थ’नाटकाचे कलावंत
‘श्री बाई समर्थ’ ह्या नाटकाद्वारे चार वर्षांनी अभिनेत्री निर्मिती सावंत रंगभूमीवर पून्हा एकदा परततायत. नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांच्या ‘अष्टविनायक’ संस्थेची निर्मिती असलेलं ‘श्री बाई समर्थ’ हे नाटक दिग्दर्शित केलंय, राजेश देशपांडे यांनी. गुजराती रंगभूमीवर आलेल्या, अनुराग प्रपन्ना लिखीत ‘धुम मचावे हाऊसवाइफ’ ह्या नाटकावर आधारित हे मराठी नाटक आहे.
‘श्री बाई समर्थ’ विषयी राजेश देशपांडे सांगतात,” निर्मितीताई आणि अष्टविनायक संस्थेसाठी एका विनोदी नाटकाच्या शोधात मी होतो. आणि त्याच सूमारास मी ‘धुम मचावे हाऊसवाइफ’ हे नाटक पाहिलं. आणि मग ते रूपांतरीत करून मराठीत आणलं. एका गृहिणीने बंड करणं, आणि आपला मेहनताना मागणं, ही कल्पना नवीनच होती. २००३मध्ये बालकल्याण आणि महिला विकास मंत्रालयाकडे गृहिणींना त्यांच्या घर सांभाळण्याचे मानधन देण्याचे बील मंजूरीसाठी गेले आहे, जे अद्याप पास होणे बाकी आहे. त्या अनुषगांने गेल्या १२ वर्षात अनेक चर्चा, उहापोह, आणि चळवळी सुरू आहेत. आणि म्हणून ती सर्व पार्श्वभूमी नाटकाला आहे. हे नाटक विनोदी असलं, तरीही, यात धांगडधिंगा नाही. खूप संवेदनशीलपणे विनोद केला गेलाय. त्यासाठी मॅच्युअर्ड अभिनेत्यांची गरज होती. आणि त्याच अनुषंगाने कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे.”
निर्मिती सावंत यांच्यासह, अरूण नलावडे, समीर चौघुले, मनमीत पेम, वनिता खरात यांच्याही ह्या नाटकात मुख्य भूमिका आहेत. निषाद गोलांबरे यांनी यातलं शिर्षक गीत लिहीले आहे.
पूढील स्लाइडमध्ये वाचा, निर्मिती सावंत यांच्या भूमिकेविषयी