आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘होणार सून...\'चा Sequel होणार नाही, मालिकेच्या सूत्रांनी दिली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका आता दिड आठवड्यात संपणार हे कळल्यावर मालिकेच्या अनेक चाहत्यांनी मग आता मालिकेत काय होणार? इथपासून श्री-जान्हवी आता कधी भेटणार इथपर्यंत अनेक गोष्टी विचारायला सुरूवात केली. काही वृत्तपत्रांनी आणि वाहिन्यांनी मालिकेचा सिक्वल होणार असल्याच्याही वावड्या पसरवल्या. मात्र असा कोणताही सिक्वलचा सध्या विचार होत नसल्याचा दावा मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसमधल्या सुत्रांनी दिलाय.
ह्या खात्रीलायक सुत्रांनी नाव न घेता सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिलीय. सूत्रांनुसार,“आम्ही कलाकारांच्या तारखाच घेतल्या नाहीत, तर सिक्वल कुठून होणार. ब-याचदा काही प्रसारमाध्यमं सुतावरून स्वर्ग गाठतात. कोणीतरी सिक्वल काढणार का? असा प्रश्न विचारला असेल. आणि मंदारदादानेही मस्करीत हो ला हो म्हंटलं असेल. पण आम्ही सध्यातरी असा कोणताही विचार करत नाही आहोत. १९ तारखेला मालिकेतले शेवटचे काही सीन आम्ही चित्रीत करत आहोत. मालिकेतल्या मुख्य कलाकारांचे अगदीच एखाद-दोन सीन सध्या राहिले आहेत. आम्ही कोणालाही तारखा मागितल्या नाहीत. अशी कोणतीही संहिताही सध्या बनलेली नाही. आणि सर्व कलाकार आता आपापल्या नव्या प्रोजक्ट्सच्या तयारीला लागलेतही. त्यामुळे सध्या अशा कोणत्याही सिक्वलची सुतराम शक्यता नाही.”
बातम्या आणखी आहेत...