आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nominations Of 52 Th Maharashtra Rajya Marathi Chitrapat Mahotsav

52व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाची नामांकने जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 52व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारासाठी अंतिम फेरीकरिता तीन नामांकने तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘नागरिक’, लोकमान्य-एक युगपुरुष’, ‘ख्वाडा’, हॅपी जर्नी’, ‘एक हजाराची नोट’, सुराज्य’, ‘सलाम’, ‘रमा माधव’, ‘पोस्टर बॉईज’ या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. त्यापैकी पाच चित्रपट अंतिम फेरीत पुरस्कार प्राप्त ठरतील. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता काकण’, दुसरी गोष्ट’, आणि ‘ख्वाडा’ या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी ‘पोस्टर बॉईज’, ‘नागरिक’, आणि ‘ख्वाडा’ यांचे नामांकन करण्यात आले आहे. त्यापौकी प्रत्येकी एक चित्रपट पुरस्कारयोग्य असेल.
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2014 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 54 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 52 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीच्या 15 तज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले.

प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून श्री. दिलीप ठाकूर, श्री. प्रदीप भिडे, श्रीमती विजया धुमाळे श्री. मनोहर रणपिसे, श्रीमती माया जाधव, श्री. मिलींद जोशी, श्री. विवेक लागू, श्री. नरेंद्र कोंद्रा, श्री. उदयसिंग मोहिते, श्री. मनोहर कुंटे, श्रीमती अपर्णा गुराम, श्री शरद सावंत, श्री अशोक सटम श्री. मेघश्याम वरळीकर आणि श्रीमती मर्मबंधा गव्हाणे यांनी काम पाहिले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या पाच तज्ञ परीक्षक मंडळाकडून संबधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार दि. 30 एप्रिल 2015 रोजी पुणे येथे चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.
अंतिम घोषित पारितोषिके-तांत्रिक विभाग व बालकलाकार-

उत्कृष्ट कला दिग्दर्शन- तेजस मोडक, प्रशांत बिडकर आणि अजय शर्मा (हॅपी जर्नी), उत्कृष्ट छायालेखन-देवेंद्र गोलतकर (नागरिक), उत्कृष्ट संकलन-जयंत जठार (हॅपी जर्नी), उत्कृष्ट ध्वनीमुद्रण-प्रमोद थॉमस (हॅपी जर्नी), उत्कृष्ट वेशभूषा-भाऊसाहेब शिंदे (ख्वाडा), उत्कृष्ट रंगभूषा-राजू अंबुलकर (ख्वाडा), उत्कृष्ट जाहिरात-हिमांशु नंदा आणि राहुल नंदा (दुसरी गोष्ट), उत्कृष्ट बालकलाकार-आशुतोष गायकवाड (काकण).
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा इतर नामांकन...