आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: आता असे दिसतात रमेश भाटकर, बघा वयाच्या पन्नाशी-साठीतील मराठी अॅक्टर्सचा Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'कमांडर' आणि 'हॅलो इन्स्पेक्टर' या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत. गायक-संगीतकार वासूदेव भटकर यांच्या घरी 3 ऑगस्ट 1949 मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला. 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. वयाची 67 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम आहे. वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेह-यावर म्हातारपणाच्या म्हणाव्या तितक्या खुणा दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीच ते 'तू तिथे मी' आणि 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेत दिसले होते.

रमेश भाटकर यांच्याप्रमाणेच अभिनेते सचिन पिळगांवकरदेखील अगदी पूर्वी इतकेच तरुण दिसतात. मात्र मराठी इंडस्ट्रीतील काही अभिनेते असे आहेत, ज्यांच्या चेह-यावर वाढत्या वयाचा परिणाम आता स्पष्ट दिसू लागला आहे.

या पॅकेजच्या माध्यामातून divyamarathi.com तुम्हाला मराठी स्टार्सचे बदलेले लूक्स दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मराठी कलाकारांचे पूर्वी आणि आताचे फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...