आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'न्यूड' विवादासाठी रवी जाधव यांनी ठोठावले कोर्टाचे दार, मराठी कलाकारांचा पाठिंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोवा येथे होणाऱ्या (IFFI)आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार होते ते 'न्यूड' चित्रपटाने. पण ऐनवेळी चित्रपट निवड समितीच्या सदस्यांनी या चित्रपटाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी याबद्दल खेद व्यक्त केला. मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडेची मूख्य भूमिका असलेला चित्रपट 'एस दुर्गा'ही महोत्सवातून काढून टाकण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. न्यूडचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी न्यायासाठी कोर्टाचे दार ठोठावले आहेत तर सर्व मराठी चित्रपटसृष्टी रवी जाधव यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. 
 
यावेळी अभिनेता सुबोध भावे, रेणुका शहाणे, निखील महाजन, कौशल इनामदार यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडीयावर न्यूडला नाकारण्याचा निषेध केला आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी याविरोधात सोशल मीडियावर कॅम्पेन सुरु केले आहे त्यासाठी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांना इफ्फीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. 
 
दिग्दर्शक रवी जाधव यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहीले आहे की, "ज्या चित्रपटावरून एवढा वाद चाललाय त्या 'न्यूड' चित्रपटाचा हा टीजर. जो वाद होतोय तो खरंच अत्यंत दुर्दैवी व खेदजनक आहे. या चित्रपटात एका कलाकाराच्या कानाखाली मारली जाते जे दुर्दैवाने आता माझ्या बाबतीत खरं ठरतंय. तरीही सर्व कलाकारांसारखा मीही अजून आशावादी आहे. सर्व IFFI ज्युरी, मीडिया व चित्रकर्मी मित्रांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल शतशः आभार. मनापासून केलेला हा चित्रपट आहे. टीजर आवडला तर नक्की शेअर करा. कमेंटमध्ये youtube लिंक टाकत आहे."
 
पुढच्या स्लाईडवर पाहा न्यूड चित्रपटाचे Teaser..
बातम्या आणखी आहेत...