आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Official Theatrical Trailer Of Swwapnil Joshi, Anajana Sukhani Starer Marathi Film Laal Ishq

स्वप्नील-अंजनाची रोमँटिक केमिस्ट्री, जाणून घ्या रोमान्स-सस्पेन्सचा तडका असलेल्या फिल्मविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये आपल्या विशेष शैलीसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ’लाल इश्क’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हटके शीर्षकामुळे या सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली आहे. सिनेमाचे कथानक काय असणार, 'लाल इश्क' म्हणजे काय याचा उलगडा लवकरच होणारेय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

ट्रेलरची पहिली झलक बघता, रोमान्स, सस्पेन्सचा तडका यामध्ये दिसतोय. स्वप्नील जोशी, अंजना सुखानी ही नवीन जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र आली आहे. जान्हवी आणि यश पटवर्धन या व्यक्तिरेखा अंजना आणि स्वप्नील यांनी सिनेमात साकारल्या आहेत. लोणावळ्याच्या एका रिसॉर्टमध्ये दोघांची भेट होते आणि तेथूनच सस्पेन्स आणि थ्रिलरचा प्रवास सुरु होतो. याच ठिकाणी दोन हत्या होतात. तेथे कुणाची हत्या होते, ते खून कोण करतो, या खुनांचा जान्हवी आणि यश यांच्याशी काय संबंध आहे, असे काहीसे सिनेमाचे कथानक असल्याचे ट्रेलरवरुन लक्षात येते.
स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित या सिनेमाचे पिक्चराइजेशन जबरदस्त दिसतंय. स्वप्नील आणि अंजनासोबत जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, कमलेश सावंत यांच्या महत्त्वाच्या भूमिका सिनेमात आहेत. शिरीष लाटकर यांनी सिनेमाचे लेखन केले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रॉडक्शनने सिनेमाची निर्मिती केली आहे. शबीना खान सहनिर्मात्या आहेत. शबीना खान हिंदी सिनेमांतील प्रसिद्ध वेशभूषाकार आणि निर्मात्या आहेत. कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है अशा अनेक भव्य सिनेमांची वेशभूषा त्यांनी केली असून, रावडी राठोड, गब्बर इज बॅक या सिनेमांची सहनिर्मिती त्यांनी केली आहे.

चला तर मग वेळ न दवडता पुढील स्लाईड्समध्ये बघा 'लाल इश्क' या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाच्या ट्रेलरची ही पहिलीवहिली झलक आणि सिनेमाची फोटो गॅलरी...