आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा 'सैराट', 'कट्यार काळजात घुसली', आणि '3:56 किल्लारी' या 3 मराठी सिनेमांचे Teaser

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सुबोध भावे दिग्दर्शित आगामी 'कट्यार काळजात घुसली' आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या सिनेमाचे टीझर नुकतेच रिलीज झाले आहे. याशिवाय लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या विनाशकारी भूकंपावर आधारित '3:56 किल्लारी' हा सिनेमाही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या तिन्ही सिनेमांची पहिली झलक लक्ष वेधून घेणारी आहे.
'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुबोध भावे, अमृता खानविलकर, साक्षी तन्वर, मृण्मयी देशपांडे आणि प्रसिद्ध गायक शंकर महादेवन या कलाकारांची झलक दिसतेय. तर 'सैराट'मध्ये मात्र दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. '3:56 किल्लारी' या सिनेमात सई ताम्हणकर, जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या तिन्ही सिनेमांचे टीझर आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नागराज मंजुळेंच्या 'सैराट'चा टीझर...
बातम्या आणखी आहेत...