आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीत कळत नाय, इंग्लिशमध्ये सांगू, I Love You, वेड लावेल \'सैराट\'चा TRAILER

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाहा 'सैराट'चा भन्नाट ट्रेलर... - Divya Marathi
पाहा 'सैराट'चा भन्नाट ट्रेलर...
दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'सैराट' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या सिनेमातील गाणी सिनेरसिकांच्या भेटीला आली. मात्र आता पहिल्यांदाच या सिनेमाच ट्रेलर बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. गाण्यानंतर या सिनेमाच्या ट्रेलरची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होते. नागराज मंजुळे यांनी आपल्या फेसबुक पेजवर हा ट्रेलर रिलीज करताच तासाभरात दीड हजारहून अधिक लोकांनी तो पाहिला. यावरुन सिनेमाविषयची प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ दिसून येतेय. मेकिंग ऑफ ‘सैराट’:एका दिवसात रिंकू शिकली बुलेट चालवायला, आकाशने कमी केले 9 किलो वजन
आर्ची आणि परशा यांच्या भन्नाट लव्ह स्टोरीची झलक ट्रेलरमध्ये बघायला मिळतेय. अभिनेत्री रिंकू राजगुरु ट्रेलरमध्ये ट्रॅक्टर चालवताना दिसतेय. दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी आपल्या अनेक मुलाखतींमध्ये आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरु या सिनेमाचा हीरो असल्याचे सांगितले, त्याचा प्रत्यय ट्रेलर बघताना येतोय. तिचे रांगडे रुप लक्ष वेधून घेणारे आहे. प्रेम, त्याला असलेला घरच्यांचा, समाजाचा विरोध असा फिल्मी मसाला ट्रेलरमध्ये बघायला मिळतोय. येत्या २९ एप्रिल रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. रिंकूला अभिनेत्री नव्हे तर व्हायचे आहे डॉक्टर, वाचा 'सैराट'च्या हीरो-हिरोईनविषयीच्या 11 गोष्टी
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ट्रेलरची झलक छायाचित्रांमध्ये... VIDEO: अजय-अतूलने दिव्यमराठीसाठी गायलं गाणं, ‘हॉलीवूडला शिकवलं याडं लागलं’ म्हणायला