आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OMG: Does Nagging Mother In Law Lalit Made Puranpoli For Swanandi?

OMG: स्वानंदीने करायला लावल्या ललिताला पुरणपोळ्या?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘नांदा सौख्य भरे’चा शब्दश: अर्थ ललिताने घेतला की काय? किंवा नवीन वर्षी ललिताने सगळ्यांशी जुळवून घ्यायचं आणि आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायचं असा संकल्प केलाय का? असा प्रश्न पडावा, अशा पध्दतीने गुढीपाडव्याच्या दिवशी ललिता वागतं होती. जहांगिरदारांच्या नवीन घराबाहेर गुढी उभारली गेली. तोरणं बांधली गेली. ललिताने चक्क हसतं स्वानंदीसोबत गुढीचं पूजन केलं. वच्छी आत्या आल्यावरही ललिता- वच्छामध्येही काही टोमणेबाजी नव्हती. त्यामूळे नवीन घरात पाऊल ठेवल्यावर ललिताचं मतपरिवर्तन झालंयं का असा प्रश्न पडला.
ह्यावर ललिताच्या भूमिकेत असलेल्या सुहास परांजपे म्हणतात, “लालची ललिताच्या चेह-यावर तुम्हांला आनंद दिसणार आहे. आणि घरात सौख्यही दिसेल. पण आता एवढ्या दिवसात परिस्थितीने टक्केटोमणे खाऊन तिचं मतपरिवर्तन झालंय, की, ललिताच्या चेह-यवरचं हसू वादळापूर्वीची शांतता आहे, हे मात्र मी तुम्हांला सांगू शकणार नाही. कारण आपल्यापेक्षा वरचढ कोणी होऊ शकतंय हे तर ललिताला सहन होणार नाही.”
स्वानंदी मात्र अर्थातच खूश आहे. तिने पुरणपोळ्या केल्यात. ती म्हणते, “गुढीपाडव्याचा गोडवा तुम्हांला मालिकेत अनुभवता येणार आहे. सकाळी चार वाजता उठून जहांगिरदारांनी गुढी उभारलीय. स्वानंदीचा नवीन वर्षातला संकल्प आहे. तो म्हणजे बचत करून, सासूबाईंच्या इच्छा पूर्ण करायच्या. कारण स्वानंदीच्या सासूबाईंना ऐहिक सुखांची खूप ओढ आहे, हे आपण आत्तापर्यंत मालिकेत पाहिलंच. त्यामूळे आता बचत करून नवीन वर्षात स्वानंदी सासूबाईंना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल.”
मालिकेत जरी स्वानंदी पुरणपोळ्या करून ललिताला खाऊ घालणार असली, तरीही मालिकेच्या सेटवर मात्र अगदी उलटं चित्र दिसत होतं. ऋतुजा बागवेच पुरणपोळ्या खाण्यात मग्न होती. त्याबद्दल ऋतुजा म्हणते, “मी खातेय त्या पुरणपोळ्या सुहासताईने घरी बनवलेल्या आहेत. ती अतिशय उत्तम पुरणपोळ्या बनवते. आणि ती माझी मैत्रिण आहे, तर तिला माझे लाड करणं, क्रमप्राप्त आहे. मालिकेतल्या स्वानंदीपेक्षा मी अगदी विरूध्द आहे. स्वानंदीला पुरणपोळ्या खाऊ घालायला आवडतात. तर मला खायला. घरी आईच्या हातच्या पुरणपोळ्यावर मी ताव मारते. तर आता इथे माझ्या मालिकेतल्या सासूच्या हातच्या पुरणपोळ्यांवर आडवा हात मारणं माझं चालू आहे. बरं, आता ह्या पुरणपोळ्या एवढ्या मस्त झाल्यात की, उद्याही येताना पुरणपोळ्या आण, अशीही मी फर्माइश केलीय. त्यामूळे सुहासताईला आता पून्हा उद्याही पहाटे उठून माझ्यासाठी पुरणपोळ्या बनवायला लागणार आहेत.”
पुढील स्लाउडमध्ये पाहा, कसा साजरा झाला नांदा सौख्य भरे मालिकेत गुढीपाडवा
(फोटो - स्वप्निल चव्हाण)