आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीर साबळेंचा नातू अडकला लग्नाच्या बेडीत, भरत जाधव-आदेश बांदेकरांसोबत पोहोचले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवणारे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे. हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात. त्यांचा नातू आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कथा, पटकथा, संवाद लेखक आणि गीतकारा ओमकार मंगेश दत्त नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला. युगेशा हे ओमकारच्या पत्नीचे नाव आहे. ओमकार आणि युगेशा यांनी लग्नासाठी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त निवडला होता. अगदी मराठमोळ्या थाटात दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. ओमकार हा शाहिर साबळेंच्या कन्या आणि लेखिका वसुंधरा साबळेंचा मुलगा आहे.
 
केदार शिंदेसोबत आहे ओमकारचे खास नाते... 
शाहीर साबळेंच्या कन्या यशोधरा शिंदे यांचा केदार शिंदे हा मुलगा. यशोधरा आणि वसुंधरा साबळे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या नात्याने केदार आणि ओमकार मावस भाऊ आहेत. तर प्रसिद्ध संगीतकार देवदत्त साबळे हे केदार आणि ओमकार यांचे मामा तर अभिनेत्री चारुशीला साबळे या त्यांच्या मावशी आहेत.

मराठी कलाकारांनी दिल्या नवदाम्पत्याला शुभेच्छा... 
अगं बाई अरेच्चा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, काकण, सिंड्रेला, 35% काठावर पास, फोटोकॉपी यांसह ब-याच सिनेमांसाठी गीतलेखन केलेल्या ओमकार आणि युगेशा यांच्या लग्नाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री क्रांती रेडकर, अभिनेते भरत जाधव आणि त्यांच्या पत्नी सरिता जाधव, आदेश आणि सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव यांनी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, ओमकार आणि युगेशा यांचा वेडिंग अल्बम... 

फोटो साभारः P16Studios फेसबुक पेज 
बातम्या आणखी आहेत...