आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Location Of Film Vrundavan\'s Dashing Promotional Song

पहा, ‘वृंदावन’ सिनेमाच्या गाण्यात पूजा-वैदेहीच्या दिलखेचक अदा, राकेशचा रफ-टफ अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतल्या उन्हात ‘वृदांवन’ फिल्मचा हिरो राकेश बापट त्याच्या दोन हिरोइन्स वैदेही परशुरामी आणि पुजा सावंतसोबत एका ‘डॅशिंग’ गाण्यावर ठेका धरून नाचत होता. बॉलीवूडचा फेवरेट कोरीओग्राफर गणेश आचार्य समोर बसून तिघांना सूचना देत होते. राकेशचे कपडे त्याच्या रफ-टफ हिरोच्या भुमिकेप्रमाणे साजेसे होते. पण दोन्ही हिरोइन्स मात्र उन्हात भरजरी साड्या आणि अंगभर दागिन्यांमध्ये नाचत होत्या.
हे नाचणं किती अवघड जातंय, असं विचारल्यावर पूजा सावंत म्हणाली, “खूप. एरवी आपल्याला नॉर्मल जीन्स-टॉप असे कपडे घालायची सवय असते. त्यामुळे उन्हातून हिंडतानाही काही वाटतं नाही. पण भरजरी नऊवारी साडी, चेह-यावर मेकअप, केसांचा मोठा अंबाडा आणि अंगभर दागिने घालून उन्हांत उभं राहायचं कोणालाही एरवी नकोसं होतं असताना, आम्हांला अख्खा दिवस उन्हात नाचायचंय म्हटल्यावर फार त्रासदायक होतं. पण हिरोइन म्हटल्यावर ह्याची आता सवय झालीय.”
पूजाला सवय झाली असली तरी दूसरी हिरोइन वैदेही परशुरामीसाठी मात्र अशी नाचायची ही पहिलीच वेळ होती. ती म्हणते, “मी कथ्थक डान्सर आहे. त्यामूळे अशा गेटअपमध्ये नाचायची सवय आहे. पण उन्हांत नाही. त्यात गाणं असं आहे. की तुमच्या नाचासोबतच एक्सप्रेशनला खूप महत्व आहे.”
वैदही पूढे म्हणते, “मी आत्तापर्यंत तीन-चार चित्रपट केलेत. पण ही माझी पहिली फिल्म आहे. ज्यातून मी माझं हिरोइन म्हणून करीयर ख-या अर्थाने सुरू करतेय. आणि पहिल्यांदाच फिल्मी गाण्यावर डान्स करतेय. पहिल्याच गाण्याचं कोरीओग्राफी गणेश आचार्य करतात. म्हणून मी खूप एक्साइटेड आहे. कथ्थक करणा-या व्यक्तिसाठी असा फ्री-स्टाइल डान्स फॉर्म करणं थोडं कठीण जातं. पण मला ह्या डान्स स्टेप्स खूप सहज जमत होत्या. त्यामुळे गणेशसरांनीही माझं कोतूक केल्याचा आनंद मला उन्हाचा उष्मा विसरायला लावतंय.”
पूजालाही गाण्याचे बोल आणि संगीत खूप आवडलं होतं. ती म्हणते, “आपण खूर्चीवर बसलो तरीही बसल्या-बसल्या नाचावंस वाटेल असं हे मस्त गाणं आहे. त्यामुळे आम्हांला एक्चुअल नाचताना तर जाम मजा येतेयं. मी तीन दिवस गाण्याची रिहर्सल केलीय. पण १०० डान्सरसोबत, ढोल ताशांच्या साथीने प्रमोशनल साँग शुट करण्याची मजा काही औरच असते.
पूजाने तीन दिवस रिहर्सल केली होती. तर फिल्मचा हिरो राकेशने सात दिवस. तो सांगतो, “गणेशसरांनी स्वत: रिहर्सलवेळी उपस्थित राहून माझ्याकडून ह्या गाण्याच्या स्टेप्स परफेक्ट करवून घेतल्यात. त्यामूळे आता चित्रीकरणावेळी मला टेन्शन नव्हतं. ‘चिकनी चमेली’, ‘हलकट जवानी’ सारखी गाणी त्यांनी कोरीओग्राफ केलीयत. आणि ती हिट झालीयत. त्यामुळे त्यांच्या गोल्डन टचमूळे हे गाणंही त्यासारखंच हिट होईल असं वाटतंय.“
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राकेश, वैदेही, पूजाचा डान्स परफॉर्मन्स
(फोटो- स्वप्निल चव्हाण)