आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जय मल्हार\'ची सांगता, बघा कलाकार On Location कशी करायचे धमाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः तीन वर्षे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलेल्या आणि तुफान टीआरपी मिळवणा-या ‘जय मल्हार’ या गाजलेल्या मालिकेची 30 एप्रिल रोजी सांगता झाली. खंडेराय, म्हाळसा आणि बाणाई यांच्या कैलास प्रस्थानासोबत या मालिकेने पूर्वविराम घेतला. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या खंडोबाच्या कथांवर आधारित या पौराणिक मालिकेने टीआरपीचे अनेक उच्चांक गाठले होते.   

महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या या मालिकेने जवळजवळ साडे नऊशे भागांचा टप्पा पूर्ण केला. जेव्हा महेश कोठारेंनी मालिकेची सांगता होणार असल्याचे जाहीर केले तेव्हा कलाकार-तंत्रज्ञ यांना धक्का बसला. मालिका संपल्याचे कळल्यावर संपूर्ण युनिटला रडू कोसळले होते. मालिका बंद होतेय कळल्यावर या मालिकेत बानूची भूमिका वठवणारी ईशा केसकर म्हणाली होती, की प्रेक्षक भक्तीभावाने ही मालिका बघतात हे त्याचं सगळ्यात मोठं यश आहे. आता उच्चांक गाठल्यावर त्याची योग्यवेळी समाप्ती होत आहे असं मला वाटतं. सेटवरची सगळी गंमत आम्ही आता मिस करू.

या मालिकेसाठी तब्बल दीड कोटी खर्च करुन भव्यदिव्य सेट बनवण्यात आला होता. तर कलाकारांच्या कॉश्च्युमवर सुमारे 50 लाखांचा खर्च झाला होता. व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करून या मालिकेतील दृष्ये साकारण्यात आली होती. ग्रीन क्रोमावर मालिकेचे जास्तीत जास्त चित्रीकरण करण्यात आले होते. 

मालिकेच्या शूटिंगच्या फावल्या वेळेत क्लिक झालेल्या कलाकारांच्या छायाचित्रांचा खास नजराणा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.   
बातम्या आणखी आहेत...