एंटरटेन्मेंट डेस्कः 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत रेवतीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री श्वेता मेहंदळे हिचा आज (06 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. मालिकेत राधिकाच्या बेस्ट फ्रेंडची भूमिका श्वेताने या मालिकेत साकारली आहे. शनाया आणि गॅरी यांचे प्रेमप्रकरण उघड करण्यात रेवतीचा मोठा वाटा आहे.
शनाया गुरुनाथच्या आयुष्यातून कायमची निघून जावी, यासाठी रेवती राधिकाला साथ देतेय. एकंदरीतच शनाया आणि गॅरीसोबत रेवतीचा छत्तीसा आकडा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण शनाया आणि गॅरीचा राग करणारी रेवती पडद्यामागे मात्र दोघांची चांगली मैत्रीण आहे.
या मालिकेत रसिका सुनील ही शनायाच्या तर अभिजीत खांडकेकर हा गॅरीच्या भूमिकेत असून अनिता दाते-केळकर ही राधिकाची भूमिका साकारत आहे. या सगळ्यांसोबत श्वेताचे अतिशय छान बाँडिंग आहे. मालिकेच्या ऑफ स्क्रिन छायाचित्रांमध्ये श्वेता या सर्वच कलाकारांसोबत धमाल करताना दिसते.
आज श्वेताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखवतोय, 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेच्या सेटवरील श्वेताचे तिच्या सहकलाकारांसोबतचे बिहाइंड द सीन्स...