आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • On Location Pics Of Bhau Kadam's Upcoming Marathi Film Song

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ON LOCATION: विनोदवीर भाऊ कदमचं आयटम साँग, मिळाली गिरीजा-आरतीची साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शूटिंग सेटवर भाऊ कदम, गिरीजा जोशी, आरती सोळंकी आणि चिन्मय उदगीरकर)
आजपर्यंत आपण आमिर खान, सलमान खान, शाहरूख खान, हृतिक रोशन या बॉलिवूडच्या चार्मिंग हिरोजनी केलेलं आयटम साँग बॉलिवूड चित्रपटांमधनं पाहिलं आहे. आता आपल्याला मराठीत सुध्दा असंच एक फक्कड आयटम साँग पाहायला मिळणार आहे. आणि ते सुध्दा सध्याचा कॉमेडी स्टार भाऊ कदमकडनं. भाऊने कॉमेडी अॅक्ट करणं किंवा चित्रपटात कॉमेडी भूमिका करणं आपल्यासाठी नवीन नाही. पण भाऊ पहिल्यांदाच आयटम साँग करतोय म्हटल्यावर उत्सुकता शिगेला पोहोचणं सहाजिकच आहे.
चॅनल यू एन्टरटेन्मेट प्रस्तूत आणि आतिफ खान निर्मित ‘वाजलाच पाहिजे- गेम की शिणेमा’ या चित्रपटात भाऊ कदम हे फक्कड आयटम साँग करताना दिसणार आहे. भाऊसोबत या गाण्यात आरती सोळंकी, गिरीजा जोशी आणि चिन्मय उदगीरकरसुध्दा आपल्याला दिसणार आहेत. मंदार चोळकरने लिहीलेल्या या गाण्याला प्रफुल्ल कार्लेकरने संगीत दिलंय.
भाऊ कदमकडनं डान्स करवून घेण्याच्या अनुभवाविषयी कोरिओग्राफर सुजीत कुमार सांगतात, “भाऊची कॉमेडी टायमिंग तर आपण सर्वांनी पाहिलीच आहे. या फिल्ममध्येसुध्दा भाऊ एका कॉमेडी भूमिकेतच दिसणार आहे. हे गाणं म्हणजे एक ड्रीम सिक्वेन्स आहे. भाऊ या चित्रपटात एका चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत आहे आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असलेल्या नव्या अभिनेत्रीसोबत डान्स करायचं तो एक स्वप्न पाहतोय. असा सिक्वेन्स आहे. एकुणच कॉमेडी ढंग असल्याने भाऊला मी डान्सस्टेप सुध्दा तशाच त-हेच्या दिल्या आहेत. आणि भाऊ सुध्दा छानच करतोय. भाऊची खासियत आहे, कॉमेडी आणि डान्सस्टेप करताना भाऊ स्वत:च थोडीशी त्यात कॉमेडी भरतो. आणि मग डान्स अजूनच मनोरंजक होतोय.”
डान्स करण्याच्या अनुभवाविषयी भाऊ सांगतो,” सुजीतने सांगितलेल्या डान्स स्टेप तशाच्या तशा करण्याच्या माझा प्रयत्न आहे. जसा ताल धरता येतो तसा मी तो धरतोय. मी ‘फू बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ मधल्या एक्टमध्ये केलेल्या हरत-हेच्या कॉमेडी स्टाइल प्रेक्षकांना आवडल्या. त्यामुळे हा थोडा अलग कॉमेडी अंदाजही लोकांना आवडेल अशी माझी अपेक्षा आहे.”
‘वाजलाच पाहिजे-गेम की शिणेमा’ हा चित्रपट 31 जुलैला रिलीज होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गाण्याच्या ऑनलोकेशनची झलक...
(फोटो- प्रदिप चव्हाण)