आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगच्या फावल्या वेळेत क्लिक झालेले \'सैराट\'च्या टीमचे फोटोज, बघा Behind The Scenes

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः महाराष्ट्रात सध्या केवळ एकच चर्चा आहे ती म्हणजे \'सैराट\' या सिनेमाची. नागराज मंजुळेंच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचली आहे. केवल 11 दिवसांत 41 कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस करुन सिनेमाने इतिहास रचला आहे. सगळीकडे हा सिनेमा हाऊसफूलच्या पाटीसह झळकतोय. प्रेक्षकांची गर्दी बघता अनेक ठिकाणी शोजची संख्या वाढवण्यात आली आहे.
 
मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच एखाद्या सिनेमाला प्रेक्षकांचा एवढा भरभरु प्रतिसाद मिळतोय. आर्ची, परशा यांचा करुण अंत प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये एवढी क्रेझ आहे, की आता परशा-आर्चीच्या मुलाचे काय होणार म्हणून प्रेक्षक विचारात पडले आहेत. 

सिनेमा रिलीज होण्याआधीपासून ते आत्तापर्यंत या सिनेमाविषयीच्या अनेक गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आज आम्ही सैराटचे पडद्यामागील खास क्षण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. \'सैराट\'च्या शूटिंग सेटवर क्लिक झालेली ही ऑन लोकेशनची छायाचित्रे क्वचितच तुम्ही पाहिली असावीत. चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, पडद्यामागील \'सैराट\'...   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...