आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जरुर घ्या अप्रतिम नाट्यानुभव 'प्रपोजल'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाट्यरसिकांच्या तरुण मंडळींना इतके उत्तम अप्रतिम नाट्यानुभव देणारे नाटक आणल्याबद्दल धन्यावाद. समाजाच्या निरोगी पणाला जपण्यासाठी वेश्याव्यवसाय हा एक सेफ्टी व्हाल्ह आहे असे समाजशास्त्रज्ञ म्हणतात. अशाच पाश्र्ववरचे हे बोल्ड नाटक राजन ताम्हने यांनी लिहुन दिग्दर्शित केले आहे आणि त्यात एक छोटी भूमिकाही केली आहे.
नाटक हे दृकश्राव्य माध्यम आहे आणि म्हणूनच नाटकात हे नेपथ्य ध्वनी, प्रकाश, संगीत या सगळ्यांचे योग्य गणित जमले की निम्मे यश त्यामुळेच मिळु शकते. त्यामुळे स्टेजवर चक्क लोकलच आणून प्रदिप मुळे यांनी धमाल उडवून दिली आहे. परिक्षणात नेहमी कथावस्तू, अभिनय याची चर्चा आधी केली जाते. पण यावेळेस नेपथ्यकाराला १०० टक्के मार्क द्यायला हवे आहेत. मुंबईच्या जीवनातला अविभाज्य मार्ग थेट रंगमंचावर आणून त्यानाटकाला व्यक्तिरेखांना जीवंतपणा आणला गेला आहे. गाडीची कमी-जास्त होणारी गती, उद्घोषणा, स्टेशनच्या पाट्या, बोगद्याचा आभास, सर्व काही खरेखुरे थक्क करणारे. मला तर चक्क बालपणच आठवले कारण मुंबईत जन्म आणि मग लोकलचे केलेले प्रवास प्रसंगानुरुप संगीत पण दाद देण्याजोगे.

दोनच प्रमुख व्यक्तीरेखा, राधा ही वेश्या आणि निवृत्ती हा पोलिस ज्यांची खरी ओळख पहिल्या अंकाच्या शेवटी होते. लोकलच्या शेवटच्या गाड्या म्हणजे मुंबईतील एक वेगळच जग असत. भय वाटू शकणारे, कधी चोरी, कधी हल्ले, बलात्कार याच्या बातम्या देणारे. अशावेळी वैतागलेनि राधा आणि निवृत्ती हे दोघेच त्या डब्यात असतात. आणि अदिती सारंगधरने अप्रतिम अभिनय करत ही राधा इतकी अस्सल उभी केली आहे की दादच देत राहावे. तिची टपोरी भाषा, उत्तान पोशाख, उत्तान हालचाली, बिनधास्तपणे सिगारेट ओढणे, दारु पिणे, पाजणे आणि त्यातच आपल्या आयुष्या बद्दलच्या कहाण्या एकमेकांना एकवण्यात एक झकास माहोल उभा होतो आणि तेवढ्यात एक पहिला धक्का बसतो. एका स्टेशनवर आत चढलेल्या आणि राधाची चेन ओढू लागणा-या माणसाचा झटापटीत तिच्या हातुन खून होतो. तेव्हा झोपलेल्या निवृत्तीली ती उठवते आणि त्याच्यातली पोलिस जागा होतो. इतका वेळ साधा भोळा वाटणारा, थोडासा घाबरट, बावळट वाटणारा निवृत्ती तिली चक्क अटक करतो आणि पहिल्या अंकाचा पडदा पडतो.

नाटकाला प्रपोजल नाव का दिल असाव याचा विचार करत असतांनाच दुसरा अंक सुरु होतो. आणि कॉलगर्ल्सची आन्टी म्हणुन जगणारी राधा थोडी थकलेली, वयस्क, धंद्यात स्थिरावलेली समोर येते. गि-हाईके मिळवुन देणा-या राजन ताम्हणे यांनी केलेल्या या व्यक्तीरेखे बरोबरच्या संवादांतुन ती आता श्रीमंत असल्याचे जाणवते. मामाने फसवुन मुंबईला आणुन मित्रांसोबत तिच्यावर बलात्कार करुन तिला धंद्याला लावले होते. त्यामुळे खुनाच्या शिक्षतून सुटल्या नंतरही तिला घरी जाता येण शक्य नव्हते.

त्या राधाच्या शोधात निवृत्ती पुन्हा पुन्हा त्या शेवटच्या लोकलमध्ये तिली शोधत राहतो आणि त्यांची भेट होते. आता ऑफिसर झाल्याने निवृत्ती तिच्या प्रेमापोटी लग्न न करता तिली प्रपोज करण्यासाठी आटापिटा करतो पण ढासळलेही तब्येत आपल्या व्यवसायाच्या दर्जाचे भान असलेली ही राधा त्याला नकार देत राहते. तेव्हा आपणसुध्दा एका व्येश्यचाच मुलगा असल्याचे वास्तव आणि लहानणाची सगळी तगमग तो तिली सांगतो फक्त नंतर एका गुरुजींचा आधार मिळणे यामुळे तो पोलिस होतो तरी मन आईतच गुंतलेले असते. राधा सुध्दा त्याला तेच प्रतिक वाटते आणि तिला सांभाळायला म्हणून तो लग्न करु इच्छित असल्याचे सांगतो. वास्तव कळल्यावर राधा तयार होते पणश्र्वास घेण्यास त्रास होत असलेली कधी कशी भेळकांडत जाते आणि धावत्या लोकल मधून खाली पडते. हा एक मोठा धक्का येथे बसतो. जीवाच्या आकांताने आक्रोश करणारा निवृत्ती मनाचा ठाव घेतो.

अदितीने दुस-या अंकातिल थोडी आजारु, वयस्क राधा अप्रतिम उभी केली आहे. तिचा राग न येता सहानुभुती वाटु लागते.आस्वाद काळे हा नट टी. व्ही. मालिकांतुन आपण बघत होतो त्यानही सुरुवातिचा साधा भोळा निवृत्ती आणि नंतर अनुभवी पोलिस ऑफिसर या दोन्ही व्यक्तीरेखा सुरेख वढवल्या आहेत. त्याचे पुन्हा पुन्हा राधाला मनवणे फार हलवून टाकते. शेवटचा आक्रोश तर इतका मनावर भिडतो आणि एक संपूर्ण नाट्यानुभव घेतल्याचे समाधान मिळते. आपल्या रोजच्या जीवनात समाजातिल हे वास्तव कोसो दुर असते पण ते जगातल्या सगळ्याच समाजामध्ये असते. या विषयावरचे हिंदी सिनेमे या निमित्ताने आठवतात.
पवन गायकवाडने बॉम्बे सतरा यानंतर प्रपोजल आणण्याचे धाडस केले त्या बद्दल धन्यवाद!
ज्यांनी हे नाटक बघीतले नाही they have miss it एका सु्ंदर कलाकृतीला ते मुकले आहेत.