आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

It’s PACK-UP: संपली ‘जुळून येती रेशीमगाठी\' वाचा, कलाकारांनी कसा Celebrate केला शेवटचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जुळून येती रेशीमगाठी’च्या सेटवरचा शेवटचा दिवस... सेटवर आदित्य-मेघनासहित दोन्हीघरची मंडळी उपस्थित होती... कलाकारांपासून ते तंत्रज्ञांपर्यंत प्रत्येकालाच आज शेवटचा दिवस हे माहित होतं... त्यामूळे ह्या रेशीमगाठी संपणार हे माहित असल्याने प्रत्येकजण दिवस आनंदात घालवण्याच्या प्रयत्नात होते. शेवटचा दिवस गोड व्हावा हा जसा निर्मात्यांचा मालिकेत प्रयत्न तसाच कलाकारांचा सेटवरही प्रयत्न चालला होता.
त्यातच बाबाजींच्या पोतडीतून काहीतरी खास निघालं आणि ते सेटवरच्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं. उदय टिकेकरांच्या पाठोपाठ मग त्यांची मालिकेतली मुलगी प्राजक्ता माळीनेही आणलेली गिफ्ट्स वाटली.
त्याविषयी प्राजक्ताला विचारल्यावर ती म्हणाली, “मी सगळ्यांसाठी टी-शर्ट्स आणले होते. माझ्या बापूसनी म्हणजेच उदय टिकेककरांनी सगळ्यांना नॅपकिन वाटले. ह्या वास्तूत आम्ही गेली दोन वर्ष आहोत. त्यामूळे अर्थातच वाईट वाटतंय. पण आजचा दिवस आम्ही एकमेकांसोबत मजेत घालवायचं ठरवलंय.”
हे प्राजक्ता बोलत असतानाच लंच टाईम झाला आणि मग त्यादिवशीचा खास मेन्यू सेटवर आला. कोणीतरी चायनिज मागवलं होतं. चायनिज आल्याचे कळताच देसाई कुटूंब एका मेकअप रूममध्ये जमलं तर मेघना आणि तिचे आई-वडिल एका मेकरूममध्ये एकत्र येऊन जेवू लागले.

उदय टिकेकरांना ह्याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, “ आमच्या शुटिंगच्या पहिल्यादिवशी आम्ही तिघं एकत्र होतो. त्यावेळी आमच्या मुलीचं मेघनाचं लग्न झालं नव्हतं. त्यामूळे आज शेवटचा दिवस आहे, हे कळल्यावर आम्ही आज आमच्या मालिकेतल्या ह्या छोट्या कुटूंबाने एकत्र लंच करायचे असे आधीच ठरवले होते. म्हणूनच आम्ही तिघजणं एकत्र जेवतोय.”
ते पूढे म्हणतात, “ मुलीच्या बापाला मालिकेत तिचे लग्न होण्यापर्यंतच महत्त्व असते. त्यामूळे ही मालिका स्विकारली होती. पण माझी भूमिका एवढी प्रसिध्द झाली, की मग मी शेवटच्या दिवसापर्यंत मालिकेत आहे. आता तर हाईकवर सुध्दा हे बाबाजी स्टिकर्स असल्याचे मला नुकतंच समजलं आहे.”
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोणी आणले, मोदक आणि कोणी आणले लाडू?