आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाडवा स्पेशल: गॅरीच्या \'राधिका\'ने पतीकडे मागितले हे खास गिफ्ट, म्हणतेय सरप्राईज आवडत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिकाने तिच्या अभिनयकौशल्यामुळे आणि नागपुरी ठसक्याच्या बोलण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत नवऱ्याच्या कुरापतींनी कंटाळलेली राधिका अर्थात अनिता दाते केळकर खऱ्या आयुष्यात बिनधास्त आहे. आज पाडवा. त्यानिमित्त अनिताने दिव्य मराठीशी मोकळेपणाने गप्पा मारल्या आणि खऱ्या आयुष्यातील 'राधिका' कशी आहे ते सांगितले. पाडव्यानिमित्त मागितली आहे खास मेकअप व्हॅनिटी...
 
राधिका सांगते, "मला सरप्राईज नाही त्यामुळे गिफ्टच्या बाबतीत मी मला जे हवे असते ते मागते आणि ते मला मिळतेही. आता दिवाळीनिमित्त मी आई-वडील, नवऱ्याकडे मला जे हवे असते ते मागते आणि तेही माझा हट्ट पूर्ण करत मला गिफ्ट देतात. पाडव्यानिमित्त मी चिन्मयकडे एक सर्व मेकअप प्रॉडक्टसने भरलेली मेकअप व्हॅनिटी मागितली आहे आणि मला ती मिळणार हे नक्की." 
 
पतीला काय गिफ्ट देणार याबद्दल सांगताना अनिता म्हणते, "मी आणि चिन्मय कधीच एकमेकांना कपडे, सोनेनाणे असे गिफ्टस देत नाही. एकमेकांची गरज ओळखून त्यावेळी जे योग्य वाटेल असे गिफ्ट आम्ही एकमेकांना देतो. चिन्मयला वाचन करण्याची खूप आवड आहे त्यामुळे त्याला सर्व दिवाळी अंक क्लब करुन मी देणार आहे."
 
मालिकेत मसाले विकणारी राधिका मात्र फराळ बनवण्यापासून दूर राहते. अनिता सांगते, "कामाच्या निमित्ताने कधीच निवांत असा वेळ मिळत नाही त्यामुळे मी फराळ कधीच बनवत नाही. घरी आई सासूबाई फराळ बनवतात त्यामुळे मी वेगळा फराळ कधीच बनवला नाही." 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अनिता आणि चिन्मयचे खास फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...