आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लव्ह लग्न लोचा'मध्ये नवा Twist, लग्नमंडपातून पळ काढून ही अॅक्ट्रेस पोहोचली राघवकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी युवावरील 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमध्ये सध्या बरीच मजा सुरू आहे. आधी राघव बाबाचे फंडे, नंतर ख्रिसमस पार्टी, त्यात सुमितने सौम्याला केलेले प्रपोज आणि नंतर त्यांच्यात दरवाजाच्या कडीवरून झालेला गैरसमज आणि त्यांनतर शिक्षा मिळालेला आणि आता काहीसा सुधारलेला राघव,  अश्या बऱ्याच घटनांनी सध्या ही मालिका तरुणाईमध्ये दिवसेंदिवस चांगलीच लोकप्रिय होत आहे. एवढा सगळा गोंधळ सुरु असताना एक नवीनच पण सुंदर ट्विस्ट लव्ह लग्न लोचाच्या मालिकेत आला आहे.
 
लग्नमंडपातून पळून आलेली एक सुंदर मुलगी, जिचं राघववर अतोनात प्रेम आहे आणि तिला राघवशीच लग्न करायचे आहे. हो म्हणजे आता कुठे राघव थोडासा सुधारतं होता पण त्याचा भूतकाळ काही त्याला सुधारू देईल असे वाटत नाही. अभिनेत्री पल्लवी पाटील ही रुचा या राघवच्या एक्स गर्लफ्रेंडच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येत आहे.  राघव आणि रुचाचे आधी प्रेमप्रकरण होते. म्हणजे राघवने रुचाला कधीकाळी पटवले होते आणि हा पट्ठ्या हे विसरूनसुद्धा गेला होता . आता बरोबर जेव्हा साहेबानी थोडंसं सुधारण्याचं मनावर घेतलंय अगदी तेव्हाच रुचाची एन्ट्री झालीय आणि नुसती एंट्री नाहीतर ती तिच्या लग्नाच्या मंडपातून केवळ आणि केवळ राघवच्या प्रेमाखातर पळून आली आहे. आता तिला फक्त आणि फक्त राघवशीच लग्न करायचं आहे . 
 
हा ट्रॅक सध्या एका हटके मोडवर आलाय. सुधारलेला राघव, चांगुलपणामुळे आता रूचाशी लग्न करायला तयार झालाय खरा पण घरातले सगळेच या गोष्टीच्या विरोधात आहेत आणि या विरोधासाठी सगळेच स्वतःची कंबर कसत आहेत. राघवने रुचाशी लग्न करू नये यासाठी आता नेहमीच राघवाच्या विरोधात असलेली काव्या आणि अभिमानाची बायको शाल्मली या दोघीनांही राघवशी लग्न करायचे आहे. आता हे काय गौडबंगाल आहे आणि राघव आता नक्की कोणाबरोबर लग्न करणार हे पाहण्यासाठी बघत राहा लव्ह लग्न लोचा रोज रात्री ८:३० वाजता फक्त झी युवावर. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, कोण आहे रुचाची भूमिका साकारणारी पल्लवी पाटील... 
 
 
बातम्या आणखी आहेत...