बॉलिवूड सिनेमे बोल्डनेससाठी ओळखले जातात. सिनेमात एखादा तरी किसींग किंवा इंटीमेट सीन्स टाकण्यावर दिग्दर्शकाचा भर असतो. त्यामुळे हिंदीत मोठ्या पडद्यावर किसींग किंवा इंटीमेट सीन्स बघण्याची सवय जणू प्रेक्षकांना झाली आहे. आता हिंदीप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीसुद्धा बोल्ड होऊ लागली आहे. सई ताम्हणकर, स्मिता गोंदकर या अभिनेत्रींनी बिकिनी परिधान करुन हम भी किसीसे कम नही... असे दाखवून दिले आहे. आता एक पाऊल पुढे टाकत मराठीतील अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे पडद्यावर किसींग सीन्स देताना दिसत आहेत.
लवकरच रिलीज होणा-या 'शॉर्टकट' या सिनेमात अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने अभिनेता वैभव तत्ववादीसोबत लिप लॉक सीन दिला आहे. पडद्यावर आपल्या सहकलाकारासोबत इंटिमेट होणारी संस्कृती पहिली अभिनेत्री नाहीये. या यादीत मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, अमृता सुभाष, उर्मिला कानेटकर, प्रिया बापट या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश आहे. या अभिनेत्रींनी पडद्यावर बिनधास्तपणे आपल्या सहकलाकारासोबत लिपलॉक सीन्स दिले आहेत. विशेष म्हणजे हे सीन्स व्हल्गर वाटणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली आहे.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये अलीकडच्या काळात कोणकोणत्या मराठीत सिनेमांमध्ये लिप लॉक सीन्स बघायला मिळाले आहेत, त्याविषयीची माहिती देत आहोत..