आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिसाद मिळाल्यास मराठी चित्रपटसृष्टी स्पर्धेत टिकेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला सांगोल्याचे सुपुत्र आणि पेइंग घोस्ट चित्रपटाचे निर्माते जयंत लाडे यांनी पहिल्याच प्रयत्नात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुंदर चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी चित्रपटाचे निर्माते वेगवेगळ्या विषयावर विविध प्रयोग करून दर्जेदार चित्रपटांची मेजवानी देत आहेत. मात्र, मराठी रसिक प्रेक्षकांनी अशा मराठी चित्रपटांना भरघोस प्रतिसाद द्यावा तरच मराठी चित्रपटसृष्टी स्पर्धेत टिकेल, बहरेल आणि मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील, असे विचार पेइंग घोस्ट चित्रपटातील कलाकार पुष्कर श्रोत्री यांनी सांगोल्यात बोलताना व्यक्त केले.
सांगोला येथील चित्रपट निर्माते जयंत लाडे निर्मित पेइंग घोस्ट चित्रपटाच्या प्रमोशनकरता चित्रपटातील कलाकार बुधवारी सांगोल्यात आले होते, त्यावेळच्या वार्तालापात पुष्कर श्रोत्री बोलत होते.
यावेळी चित्रपटातील कलाकार स्पृहा जोशी, उमेश कामत, पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, कांचन पगारे, समीर चौघुले, शर्वाणी पिल्लाई आदी उपस्थित होते. पुष्कर श्रोत्री म्हणाले की, व. पु. काळे यांच्या बदली या प्रसिध्द कथेवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटात भूत नाट्य, प्रेमकथा, निखळ मनोरंजन सामाजिक संदेश आहे. मराठी किंवा इतर कोणत्याही चित्रपटाचे प्रमोशन मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात केले जाते. मात्र, या चित्रपटाच्या प्रमोशनकरता आम्ही ग्रामीण भागातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहचलो आहे. सामाजिक संस्थांशी संपर्क साधून सामाजिक प्रश्नाबाबत संवाद साधला आहे.
चित्रपटातून मुली वाचवा, पाणी बचत काळाजी गरज, दहीहंडी मधील चुकीच्या प्रथा, सुखी जीवनासाठी समाधानी वृत्ती अशा विविध सामाजिक पैलूंना उत्कृष्टपणे स्पर्श केला आहे. भूतांवर आमचा विश्वास नाही, मात्र निखळ मनोरंजनातून समाजाला काही चांगले देण्याचा प्रयत्न केला आहे. यात उत्कृष्ट प्रेमकथा, सुश्राव्य गाणी यांचा सुरेख संगम आहे. येत्या शुक्रवारी २९ मे रोजी राज्यात हा चित्रपट सर्वत्र प्रर्दशित होत आहे. लंडन, यू. के.जर्मनी मध्ये सहा ठिकाणी चित्रपट झळकणार आहे. शासनाने केवळ संरक्षण देऊन भागणार नाही तर मराठी प्रेक्षकांनी अशा उत्तम चित्रपटांवर प्रेम करत तो चित्रपटगृहात पाहिला पाहिजे.
उद्या प्रदर्शित होणार
निर्माते जयंत लाडे म्हणाले की, मराठी चित्रपटसृष्टीत अवघ्या दहा दिवसांत धुमाकूळ घातलेल्या पी. जी. ह्या चित्रपटाने एक एप्रिल रोजी पी. जी. म्हणजे काय याचे उत्तर दिले. दहा दिवस ही स्पर्धा होती. पेइंग घोस्ट चित्रपट २९ मे रोजी सर्व चित्रपटगृहात एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुश्रुत भागवत यांनी केले असून पटकथा संवाद संजय मोने यांचे आहेत. वैभव जोशी यांनी गीते लिहिली आहेत. नरेंद्र भिडे यांचे संगीत दिग्दर्शन आहे अवधूत गुप्ते यांनी चित्रपटाकरता गाणी गायली आहेत.