आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ख-या आयुष्यात घटस्फोटित अभिनेत्यासोबत संसार थाटणारेय \'अस्मिता\', वाचा तिच्याविषयी A to Z

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी टेलिव्हिजनवरील ‘रील लाइफ’ जोडी आता ‘रिअल लाइफ’ जोडी बनली आहे. ‘अस्मिता’ या मालिकेत खासगी गुप्तहेराची भूमिका साकारणारी मयुरी वाघ आणि त्याच मालिकेत तिच्या पतीची म्हणजेच अभिजीतची भूमिका करणारा पियुष रानडे यांचा नुकताच साखरपुडा झाला. मालिका तसेच चित्रपटात एकमेकांसोबत काम करता करता कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अस्मिता-अभिची मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची आणि ख-या आयुष्यातही त्यांची जोडी असावी असंही अनेकांना वाटायचं. मयुरी-पियुषच्या चाहत्यांची ही इच्छा आता खरी झाली असून त्या दोघांनी आता आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे.
पियुषची दुसरी पत्नी होणारेय मयुरी...
अभिनेता पियुष रानडेचे हे दुसरे तर मयुरीचे पहिलेच लग्न असेल. पियुषचे पहिले लग्न टीव्ही अभिनेत्री शाल्मली टोळेसोबत झाले होते. 2010 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. मात्र फार काळ हे नाते टिकले नाही. दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. शाल्मलीपासून विभक्त झाल्यानंतर अस्मिता या मालिकेच्या सेटवर मयुरीसोबत पियुषचे सुत जुळले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि या नात्याचे रुपांतर या दोघांनी लग्नात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घेऊयात, ख-या आयुष्यात पियुषची जोडीदार बनलेल्या प्रेक्षकांच्या लाडक्या अस्मिता अर्थातच मयुरी वाघविषयी सर्वकाही..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...