आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईवडिलांची एकुलती एक लेक आहे जुई, \'पुढचं पाऊल\'पूर्वी झळकली आहे तीन मालिकांमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः आई नेत्रा आणि वडील केतन गडकरी यांच्यासोबत जुई गडकरी)
संध्याकाळचे साडे सात कधी वाजले की प्रेक्षकांना वेध लागतात ते 'पुढचं पाऊल' या मालिकेचे. या मालिकेत कल्याणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. हळवी, सतत दुसर्‍यांना मदत करण्यसाठी धडपडणारी कल्याणी म्हणून माहित असलेली जुई गडकरी खासगी आयुष्यात संकटात सापडली आहे. तिच्या जीवाला सध्या धोका आहे. तिच्या घरी तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी तिला जीवे मारण्याची धमकी आली.
जुई गडकरीचा वाढदिवस 8 जुलैला असतो आणि यंदाही तिच्या घरी त्यादिवशी मस्त सेलिब्रेशन सुरू असतानाच एक छोटा रक्तबंबाळ झालेला मुलगा दोन पत्र घेऊन जुईच्या दारी आला. त्याने ते पत्र जुईच्या काकांना दिले आणि तो पळून गेला. जुईच्या घरच्यांनी काळजीने याविषयी पोलिसांमध्ये तक्रार केलीय. पण तक्रारीनंतर खरं तर, जुईला लगेच पोलिस प्रोटेक्शन देणे आवश्यक असूनही जुईला पोलिसांनी अद्याप पोलिस संरक्षण दिले नाही.
जुई मराठी टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत आहे. खरं तर सोज्वळ आणि मनमिळाऊ स्वभावाच्या जुईला धमकी आल्याने इंडस्ट्रीतही काळजी व्यक्त केली जात आहे. तिच्या मालिकेच्या सेटवर कोणत्याही अनोखळी व्यक्तीला परवानगी दिली जात नाहीये.
'पुढचं पाऊल' मालिकेमुळे जुई घराघरांत पोहोचली. मात्र जुईचे खासगी आयुष्य कसे आहे. ती मुळची कुठली आहे, तिचे शिक्षण कुठवर झालंय, या मालिकेपूर्वी ती कुठल्या मालिकेत झळकली होती का? या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये देत आहोत.
पुढे वाचा, आईवडिलांची एकुलती एक लेक आहे जुई...