आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: गेल्यावर्षी वाढदिवशीच ओढवले होते जुईवर मोठे संकट, वाचा नेमके काय घडले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संध्याकाळचे साडे सात कधी वाजले की प्रेक्षकांना वेध लागतात ते 'पुढचं पाऊल' या मालिकेचे. या मालिकेत कल्याणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. हळवी, सतत दुसर्‍यांना मदत करण्यसाठी धडपडणारी कल्याणी म्हणून माहित असलेली जुई गडकरी हिचा आज वाढदिवस आहे. 8 जुलै 1988 रोजी जन्मलेली जुई आपल्या आईवडिलांची एकुलकती एक लेक आहे. यावर्षी आपल्या नातेवाईक आणि फ्रेंड्ससोबत जुई वाढदिवस साजरा करत आहे. मात्र गेल्यावर्षीचा वाढदिवस जुई कधीच विसरु शकणार नाही. गेल्यावर्षी वाढदिवशीच जुईवर एक मोठे संकट ओढवले होते.

काय घडले होते जुईसोबत गेल्यावर्षी वाढदिवशी...
जुई मुळची कर्जतची आहे. गेल्यावर्षी 8 जुलैला तिच्या घरी तिचे बर्थडे सेलिब्रेशन सुरु होते. मस्त सेलिब्रेशन सुरू असतानाच एक छोटा रक्तबंबाळ झालेला मुलगा दोन पत्र घेऊन अचानक जुईच्या दारी आला होता. त्याने ते पत्र जुईच्या काकांना दिले आणि तो पळून गेला. जुईला जीवे मारण्याची धमकी या निनावी पत्राद्वारे देण्यात आली होती. हे पत्र मिळताच जुईचे काका आणि वडील केतन गडकरी यांनी कर्जत पोलिसात रीतसर तक्रार दिली होती.

काय लिहिले होते निनावी पत्रात
जुईला मी 20 जुलैला संपवून टाकणार आहे. अशी धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे. तसेच जर पोलिसांना याबाबत कळविले, तर तुमच्या घरच्यांना देखील मी मारुन टाकेन, असाही या पत्रात उल्लेख करण्यात आला होता. आमची दुश्मनी फक्त जुईसोबत आहे आणि तिला मारणार लक्षात ठेवा. अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. या पत्राखाली 20 जुलै 2015 अशी तारीखही टाकण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

सेटवर नव्हता अनोळखी व्यक्तीला प्रवेश
सोज्वळ आणि मनमिळाऊ स्वभावाच्या जुईला धमकी आल्याने इंडस्ट्रीतही काळजी व्यक्त केली गेली. तिच्या मालिकेच्या सेटवर कोणत्याही अनोखळी व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई करणयात आली होती. सुदैवाने जुई या संकटातून बाहेर पडली आहे.
'पुढचं पाऊल' मालिकेमुळे जुई घराघरांत पोहोचली आहे. मात्र जुईचे खासगी आयुष्य कसे आहे. ती मुळची कुठली आहे, तिचे शिक्षण कुठवर झालंय, या मालिकेपूर्वी ती कुठल्या मालिकेत झळकली होती का? या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये देत आहोत.

पुढे वाचा, आईवडिलांची एकुलती एक लेक आहे जुई...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...