आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे पुरुषांचा तिरस्कार करणारी \'माझ्या नव-याची बायको\'मधली \'रेवती\', असे आहे Real Life

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः पुरुषांचा तिरस्कार करणारी, रोखठोक मतं मांडणारी ही आहे रेवती. बरोबर 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत राधिकाची खास मैत्रीण ही आहे 'रेवती'. मालिकेत नव-यापासून घटस्फोट घेऊन एकटीने आपल्या मुलीचा सांभाळ ती करतेय. गुरु उर्फ गॅरीचे एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर असल्याचा संशय सर्वप्रथम रेवतीलाच आला होता. प्रत्येक पावलावर रेवती राधिकाला साथ देतेय. शनायाला गुरुनाथच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी रेवती राधिकाला मदत करत आहे. अलीकडेच राधिकाने रेवतीच्या मदतीने शनायाला चांगलाच धडादेखील शिकवला. मालिकेत रेवतीची भूमिका साकारणा-या या अभिनेत्रीचे नाव आहे श्वेता मेहंदळे.
 
आज आहे वाढदिवस... 
खास गोष्ट म्हणजे आज (6 सप्टेंबर) श्वेताचा वाढदिवस आहे. 6 ऑक्टोबर 1978 रोजी श्वेताचा जन्म झाला. सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 
 
प्रसिद्ध अभिनेत्याची आहे पत्नी.. 
श्वेता ही प्रसिद्ध मराठी अभिनेता राहुल मेहंदळेची पत्नी आहे. ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकेत एकत्र काम करत असताना राहुल आणि श्वेता यांच्यात प्रेमांकुर फुलले आणि दोघांनी लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगा असून आर्य हे त्याचे नाव आहे.
 
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर झळकली आहे श्वेता..
या मालिकेपूर्वीही छोट्या आणि मोठ्या पडद्यावर श्वेता झळकली आहे. ह्या गोजिरवाण्या घरात, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या श्वेताच्या गाजलेल्या मालिका आहेत. तर धूम 2 धमाल, पाच नार एक बेजार, सगळं करुन भागलं, असा मी तसा मी, जावई बापू जिंदाबाद या चित्रपटांमध्ये श्वेताने अभिनय केला आहे.  
 
फन लव्हिंग आहे श्वेता... 
मालिकेत धीरगंभीर रेवतीची भूमिका साकारणारी श्वेता खासगी आयुष्यात फन लविंग आहे. तिच्या सोशल नेटवर्किंग साइट्वर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत धमाल करतानाची तिची बरीच छायाचित्रे बघायला मिळतात.
 
आज श्वेताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखवतोय, तिचे काही पर्सनल क्लिक्स... या छायाचित्रांमध्ये श्वेता फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत दिसतेय.... 
बातम्या आणखी आहेत...