आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal Life Pics Of Priya Bapat And Umesh Kamat

B\'day: प्रियाने केले होते उमेशला प्रपोज, पाहा मेड फॉर इच अदर या क्यूट कपलचे PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रिया आणि उमेश कामत)

मराठी सिनेसृष्टीतील बबली अभिनेत्री प्रिया बापट आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रियाने मराठी सिनेसृष्टीतील हॅण्डसम अभिनेता उमेश कामतसोबत लग्न केले आहे. उमेश आणि प्रिया यांना मराठी फिल्म इंडस्ट्रीत क्यूट कपल म्हणून ओळखले जाते.
ऑक्टोबर 2011 मध्ये हे दोघे लग्नगाठीत अडकले. लग्नापूर्वी सहा वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र या दोघांपैकी पहिले कुणी कुणाला प्रपोज केले, हे तुम्हाला ठाऊक आहे का? उमेशने प्रियाला नव्हे, तर प्रियाने उमेशला लग्नाची मागणी घातली होती. प्रियाने फोनवरुन उमेशला प्रपोज केले होते. मात्र त्यावेळी उमेशने तिला आपला होकार दिला नव्हता. खरं तर त्याच्याही मनात प्रियाविषयी प्रेम निर्माण झाले होते. मात्र हा विषय जरा ताणून धरत प्रियाला तिच्या वाढदिवशी आपला होकार द्यावा, असे उमेशने ठरवले होते. त्याप्रमाणे 18 सप्टेंबर म्हणजचे प्रियाच्या वाढदिवशी उमेशने प्रियाला लग्नासाठी होकार दिला.
आज प्रियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या क्यूट कपलची खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये प्रिया आणि उमेश यांच्यातील प्रेमाची केमिस्ट्री दिसून येते. चला तर मग पाहा प्रिया-उमेशची खासगी आयुष्यातील ही खास झलक..
(फोटो साभारः फेसबुक)