आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : ही आहे मराठी इंडस्ट्रीची \'मँगो डॉली\', सासऱ्यांच्याच सिनेमात मिळाला होता ब्रेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी ग्लॅमर इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक असलेले नाव म्हणजे उर्मिला कानिटकर-कोठारे. पुण्यात जन्मलेली उर्मिला आज (4 मे) वाढदिवस साजरा करत आहे. मराठी-हिंदी मालिकांमधून लोकांच्या मनात घर केल्यानंतर उर्मिलाने मराठी चित्रपटसृष्टीतही जम बसवला आहे. असंभव या मालिकेतून तिला विशेष ओळख मिळाली. 

उर्मिला ही कथ्थक डान्सर आहे. तिने कथ्थकचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतले आहे. तसेच ओडिसी नृत्यातही पारंगत आहे. मुंबईतील झेवियर्स कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. उर्मिलाने शुभ मंगल सावधान चित्रपटाद्वारे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अनेक चित्रपटांत तिने भूमिका केल्या. संजय जाधव यांच्या दुनियादारी चित्रपटातील तिची भूमिकाही विशेष गाजली. पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर आदिनाथ कोठारेबरोबर तिची ओळख झाली. आदिनाथ त्यावेळी चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक होता. त्यानंतर या दोघांनी 2011 साली लग्न केले. मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या सौंदर्यवतींपैकी एक असलेली उर्मिला सोशल मीडियावरही चांगलीच अपडेट असते. विविध कार्यक्रमांतील फोटो ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. उर्मिलाच्या अशाच काही फोटोंची झलक आपण पाहणार. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, उर्मिला कोठारे चे काही खास PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...