आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कच्चा लिंबू\'च्या पुण्यातील स्पेशल स्क्रीनिगला अवतरले नागराज, केतकीसह मराठी तारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - गेल्या काही दिवसांत सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'कच्चा लिंबू'. अक्षय कुमारसारख्या स्टारच्या चित्रपटाच्या स्पर्धेत कच्चा लिंबू चित्रपट प्रदर्शित झाला. पण तरीही विषय, तो मांडण्याची शैली आणि कलाकारांचा अभिनय या जोरावर या मराठी चित्रपटाने इतर चित्रपटांसाठी आव्हान निर्माण केले आहे. प्रेक्षकांसह समिक्षकांनीही चित्रपटाचे तौंडभरुन कौतुक केले आहे. 

या चित्रपटाचा स्पेशल प्रिमिअर नुकताच पुण्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागराज मंजुळे, केतकी माटेगावकर, अमृता सुभाष यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आवर्जुन उपस्थिती लावली. चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा दिग्दर्शक अभिनेता रवी जाधव याने त्याच्या फेसबूक पेजवर हे फोटो शेअर केले आहेत. 
 
रवी जाधवने लिहिले.. 
'कच्चा लिंबू' चित्रपटाच्या मुंबई व पुणे येथील 'स्पेशल' प्रीमिअरचे काही 'स्पेशल' क्षण!!! सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरेच काही सांगून जातोय!!! उत्तम कलाकृतीला तुमचा पाठिंबा असाच लाभो!!!.. 
या कॅप्शनसह रवी जाधवने फोटो पोस्ट केले आहेत. चला तर मग पाहुयात कोणकोणते तारे उपस्थित होते, या स्पेशल स्क्रीनिंगसाठी.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पुण्यातील स्पेशल स्क्रीनिंगमध्ये आलेल्या कलाकारांविषयी..
 
बातम्या आणखी आहेत...