आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : फुलवा खामकरच्या स्टुडिओच्या लाँचिंगला पोहोचले मराठी स्टार्स, धमाल-मस्तीत रंगली पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. फुलवाचं एक स्वप्न होतं, की आपली स्वतःची हक्काची अशी एक जागा असावी जिथे आपल्याला मनसोक्त डान्स करता येईल आणि आपलं स्वतःचं ऑफिस असावं. तिचं अनेक वर्षापासूनचं हे स्वप्न तिच्या वाढदिवशी म्हणजे 17 सप्टेंबर रोजी साकार झालं.
आधुनिक सोयीसुविधा असलेला PSDG DANCE STUDIO (Phulawa’s School Of Dance And Gymnastics) चं लाँचिंग 17 सप्टेंबर रोजी मुंबईत झालं. या डान्स स्टुडिओच्या लाँचच्यावेळी आदिनाथ कोठारे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, मानसी नाईक, उर्मिला कानेटकर-कोठारेे, सोनाली कुलकर्णी, सोनाली खरे, गिरिजा ओक, सुकन्या कुलकर्णी, संस्कृती बालगुडे, सुयश टिळक यांसारख्या कलाकारांनी धमाल मस्ती केली.

स्टुडिओला दिला स्वीट अँड सिंपल लूक...
फुलवाने आपल्या स्टुडिओचं डेकोरेशन अगदी साधे पद्धतीने केलं आहे. मराठी बैठक आणि लाकडी सोफ्यामुळे याला एक वेगळा टेक्झर आला आहे. फुलवाने या डान्स स्टुडिओमध्ये सर्वात जास्त लक्ष दिलं ते फ्लोरिंगकडे. थ्री लेअर असलेल्या या फ्लोरिंगमुळे डान्स करताना पायांना कमी त्रास होतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, फुलवाच्या डान्स स्टुडिओच्या लाँचिंगवेळी मराठी सेलिब्रिटींनी केलेली धमाल-मस्ती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...