आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जय मल्हार' फेम देवदत्त नागे झळकणार 'चेंबूर नाका' मध्ये, चित्रपटाचे पोस्टर लाँच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'जय मल्हार' मालिकेतील खंडेरायाच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेला देवदत्त नागे लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांना बेटणार आहे. 'चेंबूर नाका' या आगामी चित्रपटात देवदत्त झळकणार असून, त्याचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. यामध्ये देवदत्तची धडाकेबाज भूमिका राहणार असल्याची माहिती मिळाली असून, तो स्वतःच या चित्रपटाचा निर्माताही आहे. 

नितेश पवार यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टर लाँचवेळी केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री मा. खा. श्री. रामदासजी आठवले, गोस्वामी श्री नीरजकुमारजी महाराज, सुवर्णाताई डंबाळे यांची उपस्थिती होती. देवदत्तने चित्रपटात दत्ता नांगरे नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.चित्रपटाच्या विषयासोबतच धडाकेबाज व्यक्तिरेखा भावल्याचं देवदत्त म्हणतो. 
देवदत्तबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सीमा नितनवरेही या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा नितेश यांनी समध खान यांच्या साथीने लिहिली आहे. तर बिपीन धायगुडे यांच्यासोबत त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. गुरू ठाकूर यांच्या लेखनीतून साकारलेल्या गीतांना अमितराज संगीतबद्ध करणार आहेत. देवदत्तसोबत चित्रपटात उषा नाडकर्णी, विद्याधर जोशी, मिलिंद शिंदे, धनंजय पोलादे यांच्या मुख्य भूमिका आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा इतर काही संबंधित PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...