आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Kranti Redkar Launches Poster Of Her Upcoming Marathi Film Kakan

क्रांतीच्या \'काकण\'चे पोस्टर लाँच, सई-मनवासह पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('काकण' सिनेमाच्या पोस्टर लाँचवेळी क्लिक झालेली सेलिब्रिटींची छायाचित्रे)

प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरने 'काकण' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. एका भव्य कार्यक्रमात अलीकडेच या सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले. यावेळी सिनेमाची रिलीज डेट घोषित करण्यात आली. यावर्षी 10 एप्रिल रोजी 'काकण' सिनेमागृहात झळकणार आहे. पोस्टर लाँच कार्यक्रमात मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, सई ताम्हणकर, मनवा नाईक, नेहा राजपाल यांच्यासह अनेक सेलेब्स क्रांतीला तिच्या या नवीन प्रोजेक्टबद्दल शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.
'सून असावी अशी' या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या क्रांतीने शहाणपण देगा देवा, ऑन ड्युटी २४ तास, जत्रा, फक्त लढ म्हणा, तीन बायका फजिती ऐका, नो एट्री पुढे धोका आहे, पिपाणी यांसारख्या एकापेक्षा एक सरस सिनेमांमधून आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली. "कोंबडी पळाली" या तिच्या दिलखेचक नृत्यावर तर तिने तमाम रसिकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावला. आता हीच क्रांती रेडकर काकण या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात उतरली आहे. उर्मिला कानेटकर-कोठारे आणि जितेंद्र जोशी यांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.
या सिनेमाबाबत सांगायचे झाले तर ही एक लव्ह स्टोरी असून याची कथा क्रांती रेडकरने स्वतः लिहिली आहे तर पटकथा- संवाद - गीते ही क्रांती रेडकर आणि ओमकार मंगेश दत्त यांची आहेत. सिनेमाचे संगीत अजय सिंघा यांचे आहे तर सिनेमॅटोग्राफर म्हणून बिथिन दास काम पाहणार आहेत तर कार्यकारी निर्माते म्हणून मँगोरेंज काम पाहत आहे. या सिनेमाचे शुटिंग मुंबई आणि कोकणात करण्यात आले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा काकाणच्या पोस्टर लाँच इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...