आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: ओशोंवर आहे प्राजक्ताची खास श्रद्धा, यासाठी काढला होता Tattoo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीतील सोज्वळ अभिनेत्री प्राजक्ता माळी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. पुण्यात जन्मलेल्या प्राजक्ताने 2011 साली मराठी रंगभूमीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून आतापर्यंत ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. केवळ अभिनेत्रीच नाही तर प्राजक्ता उत्तम डान्सरही आहे. वयाच्या 7व्या वर्षापासून प्राजक्त भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहे. 
 
आज प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिच्या टॅटूची खास माहिती तुम्हाला देणार आहोत. ओशोंवर प्राजक्ताची श्रद्धा आहे त्यामुळे तिने उजव्या हातावर 'ओशो' टॅटू केला आहे. याबाबत प्राजक्ताला विचारले असता प्राजक्ताने सांगितले की, 'रेशीमगाठी' दरम्यान तिने अनेक पुस्तकांचे वाचन आणि सीडी ऐकत होती. त्यावेळी खास ओशो फिवर असल्याने प्राजक्ताने तो टॅटू केला. इतरांप्रमाणे पाने, फुले, पक्षी असे न गोंदवत सतत जगण्याची प्रेरणा देत राहील असा टॅटू करण्याची प्राजक्ताची इच्छा प्राजक्ताची होती. 
 
"ओशो हे कुठल्या धर्माचे नाहीत. त्याप्रमाणेच मी धर्म, जात असे काही मानत नाही. ओशोंचे विचार ऐकल्यावर मी खूप प्रभावित झाले. अभिनेत्री असल्याने तो कोणाला दिसून येऊ नये यासाठी तो बोटांच्या मधल्या गॅपमध्ये गोंदवायचा होता पण तिथे फारसे मांस नसल्याने तो तिथे न गोंदवता मनगटाच्या जवळ गोंदावे लागले" असे प्राजक्ता सांगते.

पुढच्या स्लाईडवर वाचा, प्राजक्ता तसेच इतर मराठी कलाकारांच्या टॅटूविषयी..
बातम्या आणखी आहेत...