आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘फुगे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे 14 नोव्हेंबर रोजी दिग्दर्शक अभिषेक जावकरशी विवाहबद्ध झाली. डेस्टिनेशन वेडिंग असल्याने गोव्यात हा विवाहसोहळा पार पडला. प्रार्थना- अभिषेकचे कुटुंबीय, मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
11 नोव्हेंबरलाच प्रार्थना आणि तिचे कुटुंबिय गोव्याला रवाना झाले होते. मेंदी, संगीत, हळद आणि लग्न आणि रिसेप्शन असा तीन दिवसांचा हा सोहळा पार पडला. प्रार्थनाचा सर्वात जवळचा मित्र आणि ‘कॉफी आणि बरंच काही’मधील तिचा सहकलाकार वैभव तत्त्ववादी हासुद्धा आपल्या मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला आहे. त्यासोबतच ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील तिची सहकलाकार प्रिया मराठेसुद्धा या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
याशिवाय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, शाल्मली टोळ्ये, स्वप्नाली पाटील, विराजस कुलकर्णी हे सेलिब्रिटीसुद्धा या लग्नाला आवर्जुन उपस्थित होते. 'मितवा' या चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यादेखील प्रार्थना आणि अभिषेक यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचल्या होत्या. लग्नात प्रार्थनाने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर रिसेप्शनसाठी तिने रेड कलरचा डिझायनर गाऊनची निवड केली होती.
प्रार्थना- अभिषेकचं हे ‘अॅरेंज मॅरेज’ असून एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने या दोघांची ओळख झाली. ऑगस्टमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. प्रार्थनाच्या मित्रमैत्रिणींनी तिच्या मेंदी सेरेमनीपासून ते हळद, लग्न, रिसेप्शनचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पाहुयात, सोशल मीडियावर शेअर झालेले लग्नाचे हे खास 37 PHOTOS...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.