आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळदीच्या रंगात रंगली प्रार्थना बेहेरे, वैभव तत्तवादीने फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर आणि लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे बोहल्यावर चढण्यास सज्ज झाली आहे. प्रार्थनाचा अगदी जवळचा मित्र वैभव तत्तवादीने प्रार्थनाच्या हळदीचा एक खास फोटो शेअर केला आहे. त्यात प्रार्थना भावी पती अभिषेकसोबत बसलेली आहे. तिच्या संपूर्ण अंगाला हळद लागलेली आहे. पाठमोरी वैभव तत्तवादी दिसत आहे. 
 
प्रार्थना आणि अभिषेक यांचे हे अरेंज मॅरेज आहे. अभिषेक हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आहे. प्रार्थनाच्या लग्नासाठी तिचा खास जवळचा मित्र वैभवने आवर्जून उपस्थिती लावलेली आहे. प्रार्थना आणि वैभवने कॉफी आणि बरेच काही, मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांचा आगामी सिनेमा व्हॉट्सअप लग्न लवकरच रिलीज होणार आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रार्थना बेहेरेच्या मेहंदीचा आणि इतर काही खास PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...